GPS Image esakal
ग्लोबल

GPS Image : सरहदपार प्यारवाली लव्हस्टोरी... ६५०० किलोमीटर फिरून केले असे प्रपोज की, जग राहिले बघत

सगळ्यांनाच आपलं प्रपोजल स्पेशल असावं असं वाटतं. पण या अवलियाने तर वर्ल्ड रेकॉर्डच केलं.

धनश्री भावसार-बगाडे

Biggest GPS Drawing To Propose A Girl : आपलं प्रपोजल सगळ्यात हटके असावं, आपल्या जोडिदाराला खूश करणारं तर असावंच पण त्यासोबतच एकदम खास आणि संस्मरणीय करण्याच्या नादात लोक काय काय नाही करत. काही स्पेशल प्लॅन, स्पेशल गिफ्ट्स अशा बऱ्याच गोष्टी करतात. पण सध्या अशा एका प्रेमीचं हे प्रपोजल व्हायरल होत आहे जे बघून बॉलीवूड सिनेमासुद्धी फीका पडेल. याचं हे प्रपोजल सगळं जग बघत राहीलं आहे.

GPS Image

एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ६५०० किलोमीटर लांब ड्रॉईंग बनवली. या ड्रॉईंगला जगातलं सगळ्यात मोठं GPS ड्रॉईंग म्हणूनही बघितलं जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक नकाशा दिसत आहे. ज्यावर मॅरी मी या सोबत एक हार्ट बनवलं आहे. या पोस्टला लोकांनी मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे.

वर्ल्ड रेकॉर्ड ड्रॉईंग

ही कहाणी जपानच्या अशा मुलाची आहे ज्याने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जपानची यात्रा केलीय. याशुशी ताकाहाशी याने एक GPS ट्रॅकर घेऊन संपूर्ण जपान फिरत होता. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी जगातली सर्वात मोठी GPS ड्रॉईंग बनवली.

हा फोटो सोशल मीडियाच्या ट्वीटर वर @Rainmaker1973 या हँडलवरून शेअर करण्यात आलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलेलं होतं की, ही कहाणी Yasushi Takahashi ची आहे, ज्याने आपल्या प्रेमिकाला प्रपोज करण्यासाठी जीपीएस ट्रॅकरने ६५०० किमी ची ड्रॉईंग बनवण्यासाठी संपूर्ण जपानची यात्रा केली.

या जीपीअस ड्रॉईंगच्या पोस्टला आतापर्यंत ६ मिलीयन व्हिव्यूज मिळाले आहेत. ६२k पेक्षा जास्त लाइक मिळाले आहे. लोक त्या प्रियकराचे कौतुक करत आहेत. त्याने आपल्या प्रेयसीसाठी जे केलं त्याचं एक रेकॉर्ड बनलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT