covid-19 google
ग्लोबल

Long Covid Symptoms : केस गळती, लैंगिक समस्या लाँग कोविडची आहेत ही 62 लक्षणं : स्टडी

नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून, दीर्घकाळापर्यंत कोविडशी संबंधित 62 लक्षणे समोर आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Long Covid Symptoms : जगभरात कोरानाचा प्रादुर्भाव जरी काही अंशी लसीकरणामुळे कमी झालेला असला तरी, या विषाणुची लागण झालेल्या नागरिकांमध्ये आजही लाँग कोविडची लक्षणं आढळून येत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या सर्वामध्ये युकेमध्ये नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासातून लाँग कोविडची काही लक्षणे 11 आठवड्यांनंतरही कायम राहत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये केस गळणे, छातीत दुखणे यासह नपुंसकता यासह हातापायांवर सूज आदी लक्षणांचा समावेश आहे. थकवा आणि धाप लागणे यासारखी लक्षण यापू्र्वी नोंदवण्यात आली होती. मात्र, नव्या अभ्यासातून दीर्घकाळापर्यंत कोविडची लक्षणे त्यापेक्षा खूप विस्तृत असल्याचे समोर आले आहे.

नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून, दीर्घकाळापर्यंत कोविडशी संबंधित 62 लक्षणे ओळखण्यात आली आहेत. याशिवाय जोखमीशी संबंधित काही घटकदेखील आढळून आले आहेत. जानेवारी 2020 ते एप्रिल 2021 पर्यंतच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. करण्यात आलेल्या या अभ्यासासाठी इंग्लंडमधील 450,000 हून अधिक लोकांच्या इलेक्ट्रॉनिक प्राथमिक देखभाल नोंदींचे विश्लेषण केले गेले आहे. ज्यांना कोविडचे निदान झाले होते. यापैकी 1.9 दशलक्ष नागरिकांमध्ये कोविडचा कोणताही पूर्व इतिहास नव्हता. यासाठी दोन लागण झालेले आणि न झालेल्या नागरिकांचे दोन गट करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी नोंदवलेल्या 115 लक्षणांमधील फरकाचे मूल्यांकन करण्यात आले.

ज्या व्यक्तींना कोविडची लागण झाली होती त्यांचे किमान 12 आठवड्यांनंतर मूल्यमापन करण्यात आले. त्यावेळी अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांमध्ये कोविडचे निदान झाले होते त्यांच्यामध्ये 62 लक्षणांची नोंद होण्याची शक्यता अधिक होती. त्यापैकी केवळ 20 लक्षणांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या लाँग COVID मध्ये करण्यात आलेला आहे. जसे की, वास कमी होणे, श्वास लागणे आणि थकवा आदी लक्षणांचा समावेश होता. वेगवेगळ्या गटांमध्ये कोविडची लक्षणे किती काळ टिकतात हे शोधून काढल्याने शास्त्रज्ञांना शरीरातील विविध रोगांबद्दल अंदाज लावणे आणि त्यावर भविष्यात उपचार करण्यास मदत होऊ शकते असा अंदाज आहे.

लाँग कोविड संबंधित करण्यात आलेल्या या अभ्यासादरम्यान, सुमारे 80 टक्के लोक असे होते ज्यांना लाँग कोविडमुळे थकवा, डोकेदुखी, अंग दुखी यासारख्या अनेक लक्षणांचा सामना करावा लागला. तर, दुसरा गटातील 15 टक्के नागरिकांना प्रामुख्याने मानसिक आरोग्य आणि संज्ञानात्मक लक्षणे होती. ज्यामध्ये नैराश्य, चिंता, डिसफोरिया आणि निद्रानाश यांचा समावेश होता. तिसरा आणि सर्वात लहान गटातील नागरिकांना मुख्यतः श्वासोच्छवासासंबंधी त्रासाचा सामना करावा लागला. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला आणि घरघर अशा लक्षणांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे; संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या आमदाराची खोचक टीका

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result : 'ईव्हीएम'विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - डॉ. हुलगेश चलवादी

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT