hajj pilgrimage marathi news hajj pilgrimage marathi news
ग्लोबल

Hajj pilgrimage : हाजींचा आकडा ९ लाखांवर; यात्रेकरूंच्या संख्येत वाढ

सकाळ डिजिटल टीम

‘हज’ (haj pilgrimage) ही मुस्लिम (Muslim) लोकांसाठी असलेली यात्रा आहे. ही एक पवित्र यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी हज यात्रा करावी असा कुराणमध्ये (Quran) आदेश आहे. यामुळेच दिवसेंदिवस यात्रेकरू यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (hajj pilgrimage marathi news)

हज यात्रेला (haj pilgrimage) इस्लामने अतिशय पवित्र मानले आहे. ज्यामध्ये ते दायित्व म्हणून घेतले जाते. यंदाच्या हज हंगामात हाजींना दिल्या जाणाऱ्या सुविधांची संख्या वाढली आहे. या मोसमात अधिक संख्येने यात्रेकरू सौदीला पोहोचत आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर हज यात्रेला परवानगी मिळाल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

यंदाच्या हज यात्रेत (haj pilgrimage) एकूण यात्रेकरूंची संख्या ८,९९,३५३ वर पोहोचली आहे, असे सांख्यिकी सामान्य प्राधिकरणाने सांगितले आहे. हे लक्षात घ्यावे की यात ७,७९,९१९ परदेशी यात्रेकरू आणि १,१९,४३४ देशी यात्रेकरू आहेत. आतापर्यंत पुरुषांची संख्या ४,८६,४५८ आणि महिलांची संख्या ४,१२,८९५ आहे.

चांगल्या सुविधांची व्यवस्था

हज यात्रेत विमानाने ७,३६,६८० यात्रेकरू, ३५,२१० यात्रेकरू जमिनीने आणि ६,०२९ यात्रेकरू सागरी बंदरांमधून आले आहेत. हज आणि उमराह मंत्रालयाने हाजींसाठी चांगल्या सुविधांची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय पथकापासून शस्त्रक्रिया, तात्काळ वैद्यकीय निर्वासन अशा जवळजवळ सर्व व्यवस्था उपलब्ध आहेत.

नावाला हाजी ही पदवी जोडू शकतात

इस्लाममध्ये (Islam) शारीरिक, आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाणे बंधनकारक आहे. जे लोक आयुष्यात एकदा हज यात्रा करतात, ते त्यांच्या नावाला हाजी ही पदवी जोडू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT