Hajj 2023 esakal
ग्लोबल

Hajj 2023 : हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज ! नियमांमध्ये शिथिलता, जाणून घ्या बदल

हज यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Hajj 2023 : हज यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने सोमवारी जाहीर केले की यावर्षीच्या हजसाठी यात्रेकरूंच्या संख्येवरील मर्यादा रद्द करून अधिक लोक यात्रेला जाण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर सौदीने वयोमर्यादाही हटवली आहे. म्हणजेच आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, देशाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबिया यांनी जाहीर केले की, यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल आणि या वर्षी हज यात्रेकरूंसाठी कोणतीही वयोमर्यादा नसेल.

दुसरीकडे, अरब न्यूजनुसार, 2019 या वर्षाबद्दल बोलायचे तर, सुमारे 25 लाख लोक हजसाठी गेले होते. यानंतर कोविडमुळे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या कमी झाली.

5 जानेवारी रोजी, सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने सांगितले की स्थानिक रहिवाशांसाठी हज पॅकेजच्या चार श्रेणी उपलब्ध असतील. ज्यांना हजला जायचे आहे ते जुलैच्या मध्यापर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी वैध राष्ट्रीय किंवा निवासी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यात्रेकरूंकडे COVID-19 आणि सीझनल इन्फ्लूएंझा लसीकरणाचा पुरावा असणे आवश्यक आहे.

भारतातील यात्रेकरूला हजसाठी किती खर्च करावा लागतो?

2019 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर एका हज यात्रेकरूला 2 लाख 36 हजार रुपये खर्च करावा लागला होता, तर 2022 मध्ये एका यात्रेकरूला सुमारे 4 लाख रुपये खर्च करावा लागला होता. खरे तर सौदी अरेबिया सरकारने हजवरील कर 15 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

देशातील प्रत्येक शहराची किंमत वेगळी आहे

वास्तविक, देशातील विविध शहरांतून हजला जाणार्‍या यात्रेकरूंना त्या शहरानुसार खर्च करावा लागणार आहे. २०२२ च्या हज यात्रेसाठी हज इंडिया कमिटीने निश्चित केलेले शुल्क वाचा.

कोणत्या शहरात किती फी

शहर शुल्क

मुंबई - 3,76,150

अहमदाबाद - 3,78,100

कोचीन - 3,84,200

दिल्ली - 3,88,800

हैदराबाद - 3,89,450

लखनौ - 3,90,350

बंगलोर - 3,99,050

कोलकाता - 4,14,200

श्रीनगर - 4,23,000

गुवाहाटी - 4,39,500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT