Hajj Yatra 2024 esakal
ग्लोबल

Hajj Yatra 2024 : हज यात्रेकरू आपल्या सोबत कफन का घेऊन जातात? यात्रे दरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय करतात?

सकाळ डिजिटल टीम

Hajj Yatra 2024 :

इस्लाम धर्मात पवित्र हज यात्रेला महत्त्वाचे स्थान आहे. सौदी अरेबियामध्ये असलेल्या हज यात्रेला सुरवात झाली आहे. पण, कडक उन्हामुळे आतापर्यंत उन्हाच्या तडाख्यामुळे एक हजाराहून अधिक हज यात्रेकरूंनी प्राण गमावले आहेत.

अनेकदा परदेशात मृत्यू झाल्यास एखाद्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या देशात परत पाठवला जातो. मात्र हज यात्रेदरम्यान असे होत नाही. हज यात्रा करताना प्राण गमावल्यानंतरचे नियम काय आहेत, हज यात्रेला जाणारा व्यक्ती सोबत येताना कफन घेऊन येतो, तर त्यामागे काय नियम आहेत. याबद्दल माहिती घेऊयात.

इस्लाम धर्मात पाच कर्तव्य सांगितली जातात. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज ही ती कर्तव्ये आहेत. असे मानले जाते की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी. दरवर्षी जगभरातून मुस्लिम हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सौदी अरेबियातील मक्का गाठतात.

हज यात्रा पाच दिवस चालते आणि ईद अल-अधा किंवा बकरीदला संपते. सौदी अरेबियाने बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांसाठी कोटा तयार केला आहे. त्यानुसार त्या वर्षात कोणत्या देशातील किती मु स्लिम हज करू शकतात हे ठरवले जाते.

भारतीय हज समिती दरवर्षी हजसाठी इच्छुक यात्रेकरूंकडून अर्ज मागवते आणि यात्रेकरूंची निवड करते. मुस्लिम यात्रेकरूंसाठी हज आणि संबंधित बाबींसाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी ही समिती आहे.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही समिती हज यात्रेपूर्वी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. ज्यामध्ये अर्ज करण्यापासून ते सौदी अरेबियामध्ये राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास काय होईल हेही या मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आले आहे.

'हज यात्रे दरम्यान एखाद्या यात्रेकरूचा नैसर्गिक कारणांमुळे किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्यास, सौदी अरेबियामध्ये प्रचलित प्रथेनुसार त्या व्यक्तीचे दफन केले जाईल. हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र थेट भारतीय वाणिज्य दूतावासाकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाठवले जाईल.

सौदी अरेबियाच्या हज कायद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हज करताना जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या देशात पाठवले जाणार नाही, तर त्याचे दफन सौदी अरेबियातच केले जाईल.

प्रत्येक हज यात्रेकरू सौदी अरेबियात येण्यापूर्वी एक अर्ज भरतो. ज्यामध्ये तो नियमांचे पालन करण्यास सहमत असतो. यात्रेला जाणारी व्यक्ती संबंधित फॉर्म भरते. मक्का आणि मदिना बद्दल मुस्लिम समाजात एक समज आहे की त्यांना इथल्या मातीत दफन केले जाणे हे पवित्र आहे.

एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू झाला की संबंधित देशाच्या हज कमिशनला कळवले जाते. यात्रेकरूंना हज यात्रेत बेल्ट दिला जातो. जो गळ्याभोवती किंवा हातात घातला जातो. त्यावरून व्यक्तीची ओळख पटते. या पट्ट्यांवर मृत व्यक्तीचे नाव, वय, एजन्सी आणि देश याबद्दल माहिती देते. मृत व्यक्तीचे कोणी नातेवाईक किंवा ओळखीचे लोक यात्रेत असतील तर तेही त्याचीही ओळख पटवतात.

मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर मान्यताप्राप्त डॉक्टर किंवा जवळच्या हॉस्पिटलकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतले जाते. त्यानंतर मृतदेहाला आंघोळ घालण्याचे आणि दफन करण्याचे काम सुरू होते. यात्रेकरूंना त्याच्याच कफनात पुरले जाते.

वास्तविक हज यात्रेला जाणारे लोक सोबत पांढरे कापड घेऊन जातात. याला कफन म्हणतात. प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यास त्याला या कपड्यात गुंडाळून दफन केले जाते.

मक्का, मिना किंवा मुझदलिफामध्ये राहताना एखादा व्यक्ती मरण पावला, तर त्याची नमाज-ए-जनाजा मस्जिद अल-हराम किंवा काबा शरीफमध्ये अदा केली जाते. जर एखाद्या हाजीचा जेद्दाहमध्ये किंवा इतरत्र मृत्यू झाला तर त्याची नमाज-ए-जनाजा स्थानिक मशिदीत अदा केली जाते.

जर मृत व्यक्तीचे कुटुंब मक्कामध्ये उपस्थित असेल तर त्यांना मृतदेहाचे अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळते. अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासही सांगितले जाते. पण, ते परदेशात असतील तर मात्र त्यांच्या येण्याची वाट पाहिली जात नाही. मृत लोकांना मदिना येथे असलेल्या 'जन्नत-उल-बाकी' नावाच्या कब्रस्तानात दफन करण्यात येते.

असे मानले जाते की हज यात्रेच्या वाटेवर, किंवा मशिद आवारात एखादा व्यक्ती मृत्यूमुखी पडणे भाग्याचे मानले जाते. एखाद्या नशिबवान व्यक्तीलाच असे मरण येते असे मानले जाते. त्यामुळे, कुटुंबातील सदस्य तिथे मरण पावला तर तिकडेच त्याचे अंत्यसंस्कार केले जावेत अशी कुटुंबियांचीही इच्छा असते.

असंही म्हणतात की, मक्काजवळ आब-ए-जमजमचे पाणी आहे. जे इस्लाम धर्मात पवित्र मानलं जातं. जे लोक घरातून कफन घेऊन तिकडे जातात. किंवा तिथे पांढऱ्या रंगाचे कापड विकत घेतात ते त्या पाण्यात बुडवून घरी येतात. जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तेव्हा त्याला याच कफनमध्ये अंतिम निरोप दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

IND vs PAK: भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीतला दुखापत

SCROLL FOR NEXT