Indian politician shares stage with Hamas chief Ismail Haniyeh eSakal
ग्लोबल

Nitin Gadkari: हत्येच्या काही तास आधी हमास प्रमुख अन् गडकरी होते एका मंचावर! समोर आला फोटो; नेमकं काय घडलं?

Indian politician shares stage with Hamas chief Ismail Haniyeh : या कार्यक्रमानंतर काही तासांमध्ये तेहरानच्या एका हॉटेलमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली.

रोहित कणसे

इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्‍कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया हे एकाच व्यासपिठावर आले होते. योगायोग असा की, या कार्यक्रमानंतर काही तासांमध्ये तेहरानच्या एका हॉटेलमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसादवर केला जात आहे.

हानिया याच्या मृत्यूनंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त नासिर खानानी यांनी बुधवारी इस्त्राईलवर टीका केली होती. ते म्हणाले की, पॅलेस्टिनी स्वत्र्यंत्र्य संघटना हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हानिया यांच्या रक्त वाया जाणार नाही. या विरोधाच्या लढाईत पॅलेस्टाईन इराण संबध आणखी मजबूत होतील.

तेहरानच्या कार्यक्रमात हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्यासोबतच पॅलेस्टाईन सशस्त्र समूह इस्लामिक जिहादचे प्रमुख जियाद अल-नखलाह देखील उपस्थित होते. लेबनानचा शिया सशस्त्र गट हिजबुल्लाहचे उप महासचिव नईम काशेम आणि येमनचे हौथी विद्रोही गटाचे प्रवक्त मोहम्मद अब्दुस्सलाम हे देखील या कार्यक्रमात सहभागी झालो होत. विशेष बाब म्हणजे इस्माईल हानिया याने कतारच्या मध्यस्थीत इस्त्राईलसोबत गाझा युद्धविराम चर्चेदरम्यान हमासच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले होते.

हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हानिया हा कतारची राजधानी दोहा येथे डॉ. मसूद पेझेश्‍कियान शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेहरानला गेला होता. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळातील वरिष्ठ नेते नितीन गडकरी हे देखील सहभागी झालो होते. यांच्यासोबतच वेगवेगळ्या देशांचे नेते आणि सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.

संपूर्ण कुटुंबाची हत्या

यापूर्वी इस्माईल हानिया यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या हत्येचा आरोप इस्त्राइलवर लावण्यात आला आहे. याच वर्षी जूनमध्ये त्यांनी गाझामध्ये अल-शती या विस्थापितांच्या शिबीराजवळ हानिया यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. ज्यामध्ये हानिया यांच्या खुटुंबातील १० सदस्य ठार झाले होते. तसेच एप्रिल महिन्यात इस्त्राइली सैन्याने केलेल्या हल्ल्यात हानिया यांची तिन मुले मारले गेले होते. यापूर्वी हानिया यांचे भाऊ आणि भाचा देखील असेच मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: १८ वर्षीय खेळाडूसाठी मुंबईचा हट्ट; मराठमोळा तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सकडे

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT