Hamas Commander eSakal
ग्लोबल

Hamas Commander : 'इस्राइल तर सुरुवात आहे.. संपूर्ण जगावर आमचं राज्य असेल', हमासच्या कमांडरचं वक्तव्य; पाहा व्हिडिओ

Sudesh

शनिवारी गाझा पट्ट्यातून इस्राइलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला हमास या दहशतवादी संघटनेने केला होता. यानंतर इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झालं आहे. यातच हमासचा कमांडर मोहमूद अल-जहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

इस्राइल ही तर केवळ सुरुवात असून, लवकरच संपूर्ण जगावर आम्ही कब्जा करणार आहे; असं या कमांडरने म्हटलं आहे. "आम्ही ताब्यात घेतल्यानंतर पृथ्वीच्या संपूर्ण 510 मिलियन स्क्वेअर किलोमीटर भागातून अन्याय नाहीसा होईल. या जगामध्ये कुणावरही जुलूम होणार नाहीत, विश्वासघातकी ख्रिश्चन धर्म नसेल आणि पॅलेस्टिनी किंवा अरबी लोकांच्या हत्या होणार नाहीत." असंही तो म्हणाला.

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांमध्येच इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपलं स्टेटमेंट जारी केलं. "हमास ही दाएश (इस्लामिक स्टेट) प्रमाणेच दहशतवादी संघटना आहे. ज्याप्रमाणे जगाने आयएसचा नायनाट केला, त्याप्रमाणेच आम्हीदेखील हमासला नष्ट करू." असं नेतन्याहू म्हणाले.

शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासने इस्राइलवर तब्बल पाच हजार मिसाईल डागले होते. तसंच, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलच्या सीमेतून आत शिरत नागरिकांची हत्या करण्यास सुरुवात केली होती. यानंतर काही तासांमध्येच इस्राइलने युद्धाची घोषणा करत हमासवर हल्ला केला होता. यानंतर इस्राइल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT