Hamas Israel War Esakal
ग्लोबल

Hamas Israel War: गाझामधील महिलेची प्रसूतीसाठी ५ किमीची पायपीट; रूग्णालयात ४ मुलांना दिला जन्म

गाझा आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेकांचे जीवन संकटात सापडले आहे. एका गरोदर महिलेला रूग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल ५ किलोमीटरपर्यंत पायी चालत जावं लागलं.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही महिन्यापासून सुरू असेलेल्या हमास -इस्त्राइल यांच्यातील युध्दाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दोन्ही देशातील नागरिकांवर झाल्याचे दिसून येत आहे. गाझा आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेकांचे जीवन संकटात सापडले आहे. या दरम्यान एक बातमी समोर आली आहे. एका गरोदर महिलेला रूग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल ५ किलोमीटरपर्यंत पायी चालत जावं लागलं. त्या महिलेने रूग्णालयात चार बाळांनी जन्म दिला आहे.

दक्षिण गाझा येथील रुग्णालयात इमाम अल-मसरी नावाच्या महिलेने 4 मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी 2 मुले आणि 2 मुली आहेत. यातील एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इमाम यांना जबलिया निर्वासितांच्या शिबिरावरपासून रूग्णालयात पोहोचण्यासाठी 5 किलोमीटरचे अंतर पायी चालत यावे लागले आहे.

उत्तर गाझा येथील रहिवासी इमान अल-मसरी युद्धादरम्यान सुरक्षिततेच्या शोधात आपल्या कुटुंबासह बीत हानौन येथील आपल्या घरातून पळून गेली होती. तिने सांगितले की, जेव्हा ती घरातून पळून गेली तेव्हा ती 6 महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्यासोबत तीन मुले होती. निर्वासितांसाठी बांधलेल्या अल-बाला येथील शाळेत इमान तिच्या कुटुंबासह राहत आहे. त्याच्याशिवाय आणखी ५० कुटुंबे येथे राहतात.

28 वर्षीय महिलेने सांगितले की, तिला रुग्णालयात पोहोचण्यासाठी 5 किलोमीटरचे अंतर पायी चालत जावे लागले. यामुळे तिला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. 18 डिसेंबर रोजी तिने 4 मुलांना जन्म दिला. दोन मुली टिया आणि लिन आणि मुलगे यासिर आणि मोहम्मद आहेत. इमामने सांगितले की "मोहम्मदचे वजन फक्त एक किलोग्राम (2.2 पौंड), तो जगू शकत नाही."

प्रसूतीनंतर ताबडतोब, तिला तिच्या तीन नवजात मुलांसह हॉस्पिटल सोडण्यास सांगण्यात आले कारण ती जागा इतर युद्धातील जखमींसाठी देखील होती.

इमामने सांगितले की, जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आम्ही विचार करत होतो की, ते फक्त एक किंवा दोन आठवडे चालेल. म्हणूनच आम्ही उन्हाळ्याचे कपडे सोबत घेतले. पण आता आमचे जीवन नरकासारखे आहे. आता 11 आठवडे झाले आहेत, या युद्धाचा 24 लाख लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT