प्रेषित मोहम्मद यांच्यावरील भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पॅलेस्टाईनमध्ये निषेधाची आग पेटली आहे. अल अक्सा मशिदीत हिंदूंच्या विरोधात रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदूंविरुद्ध जिहाद पुकारण्याची हाक देण्यात आली. भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ १० जून रोजी हिंदूविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (Hate speech against Hindus; call to attack Pakistan on India)
द मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, पॅलेस्टिनी इस्लामिक विद्वान निधाल सियाम यांनी गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंविरुद्ध जिहाद सुरू करण्याचे आवाहन केले. भारताच्या (India) शेजारी देश पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, पाकिस्तानकडे हिंदूंना धडा शिकवण्यासाठी सक्षम लष्कर आहे.
आम्ही अल अक्सा मशिदीतून मुस्लिमांच्या सैन्याला संबोधित करीत आहोत. इजिप्त, तुर्कस्तान, जॉर्डन आणि सर्व मुस्लिम देशांमध्ये आम्ही म्हणत आहोत तुम्ही कुठे आहात? तुमचा धर्म आणि पैगंबर मुहम्मद यांना पाठिंबा देण्याची हीच योग्य वेळ नाही का? आपल्या देशांना स्वतंत्र करण्याची हीच योग्य वेळ नाही का? पाकिस्तानच्या (Pakistan) लोकांनो, हिंदूंशी लढण्याची जबाबदारी इतर कोणापेक्षाही तुमच्यावर आहे, असेही निधाल सियाम म्हणाले.
व्हिडिओमध्ये मुस्लिम देशांना हिंदूंच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेने सर्वप्रथम इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला. यानंतर स्वीडनने मुस्लिम मुलांचे अपहरण केले. फ्रान्सने हल्ला केला. रशियन लोकांनी अनेक वेळा हल्ले केले. त्यानंतर चीनने गुन्हे केले. आता गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंनी मशिदी उद्ध्वस्त केल्या. मुस्लिमांना मारून त्यांची गावे उद्ध्वस्त केली, असेही व्हिडिओत म्हटले आहे.
पाकिस्तानातून आवाहन
पाकिस्तानच्या (Pakistan) लोकांनो, तुम्हाला हिंदूंशी लढण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. हिंदू तुमच्या सीमेवर आहेत. त्यांनी तुमच्या जमिनी काबीज केल्या आहेत आणि तुमच्या लोकांना मारत आहेत. हिंदूंशी लढण्याची वेळ आली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा वाद थांबण्याऐवजी चिघळत चालला आहे. अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्याही येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.