Ebrahim Raisi 
ग्लोबल

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरची हार्ड लँडिग झाल्याचे वृत्त आहे. बचावपथक मदतीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. अपघातात नेमकं काय झालंय याची माहिती देण्यात आलेली नाही. फक्त, हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा रिपोर्ट अनेक स्थानिक माध्यमांनी दिला आहे. (Iranian president Ebrahim Raisi )

रिपोर्टनुसार, हेलिकॉप्टरमध्ये देशाचे अर्थमंत्री अमीर अबोल्लाहीन हे देखील अध्यक्षांसोबत उपस्थित होते. अध्यक्ष रईसी यांच्या ताफ्यामध्ये एकूण तीन हेलिकॉप्टर होते. यातील दोन हेलिकॉप्टर नियोजित स्थळी पोहोचले आहेत. पण, तिसऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. सूचना मिळताच बचावपथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

मंत्री अहमद वाहिदी यांनी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'यासंदर्भात अधिक अपडेल अद्याप मिळालेले नाहीत.' ६३ वर्षीय रईसी हे २००१ मध्ये दुसऱ्यांदा देशाचे अध्यक्ष झाले आहेत. ते सत्तेत आल्यापासून नीतिमत्ता कायदे अधिक कठोर झाल्याचं पाहायला मिळतं. तसेच सरकारविरोधातील आंदोलने कठोरपणे चिरडण्यात आले आहेत. याशिवाय त्यांनी अणुबॉम्बबाबत जगातील देशांसोबत चर्चा सुरु केली आहे. अयातुल्ला खोमेनी यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांना पाहिलं जातं

इराण मिडियाच्या माहितीनुसार, अध्यक्ष रईसी हे एका धरणाचे उद्घाटन करून परतत होते. त्यावेळी त्यांना हेलिकॉप्टरमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे हार्ड लँडिग करावी लागली. त्यांचे ठिकाण कळू शकलेलं नाही. यासाठी एक पथक रवाना करण्यात आलं आहे. ड्रोन्सची देखील मदत घेतली जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये अन्य काही मंत्री होते असं सांगितलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पर्यायी राजकारणाच्या नावाखाली स्वार्थी कार्यपद्धती, गणपती मिरवणुकीत दगडफेक; मोहन भागवतांनी कोणते मुद्दे मांडले?

Raj Thackeray: "तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वचपा काढा, ही क्रांतीची वेळ मला संधी द्या" राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

Dussehra Melava 2024 Live Updates: पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा

Hasan Mushrif : 'राजेंनी ईडी लावली म्हणून मला भूमिका बदलावी लागली, नाहीतर..'; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर निशाणा

Dussehra 2024 : घरोघरी अवतरले चैतन्य! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी, सोने, झेंडु फुले महागले

SCROLL FOR NEXT