israel hamas war sakal
ग्लोबल

Israel–Hamas war: इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार; शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा

बैरुत: इस्राईलकडून लेबनॉन आणि गाझा पट्टीवर हल्ले सुरूच असून एकामागून एक क्षेपणास्त्र डागले जात आहेत. यादरम्यान, बैरूत येथील हवाई हल्ल्यात हिजबुल्ला संघटनेचा संशोधन आणि विकास (आर ॲड डी) विभाग नष्ट केला. या युनिटचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार झाला. त्याच्या मृत्यूने हिज्बुल्ला संघटनेला मोठा धक्का बसला. संशोधन आणि विकास विभाग नष्ट झाल्याने संघटनेतील शस्त्रविषयक व्यवहार विस्कळित होऊ शकतो. इस्राईलच्या आयडीएफने मंगळवारी हवाई हल्ल्याची माहिती दिली आणि त्यांनी रसद विभागाचा कमांडर सुहैल मारला गेल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेबद्दल हिज्बुल्लाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इस्राईलचा आर ॲड विभागावरचा हल्ला हा हिज्बुल्लाचे सामर्थ्य कमकुवत करण्याच्या रणनितीचा भाग मानला जात आहे. हिज्बुल्ला संघटनेचा वेळ संघटना बांधणीत जाणार आहे आणि अशा स्थितीत दहशतवादी कारवाया कमी होऊ शकतात. आयडीएफने एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले, इस्राईलच्या सैनिकांनी हिज्बुल्लाच्या मुख्यालयातील संशोधन आणि विकास विभाग उध्ववस्त झाला असून त्याचा प्रमुख सुहैल हुसेन हुसैनी मृत्युमुखी पडला.

इंटिलिजिन्स डिव्हिजनच्या निर्देशानुसार इस्राईलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने बैरुतमधील हिज्बुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. तत्पूर्वी ३ ऑक्टोबर रोजी आयडीएफने हमासच्या आघाडीच्या तीन नेत्यांच्या हत्या केली होती. यात गाझा सरकारचा प्रमुख राव मुश्‍ताहा याचा समावेश होता. उत्तर गाझातील एका भूमिगत भागावरच्या हल्ल्यात रावी मुश्‍ताहा आणि हमासचे दोन अन्य कमांडर समेह सिराज व समेह औंदेह मारले गेले.

सुहैल हुसैनी कोण होता
सुहैलला हिज्बुल्ला संघटनेचा आर्थिक कणा होता. शस्त्र खरेदीसाठीचे बजेट तयार करणे, इराणकडून शस्त्र आयातीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी तो सांभाळत होता. सुहैल हुसेन हुसैनी हा हिज्बुल्ला संघटनेतील आघाडीच्या कमांडरमध्ये सामील होता. तो दहशतवादी कारवायासाठी शस्त्रांचा पुरवठा करणे, शस्त्रांची साठवणूक करणे, शस्त्रे कोठून आणायचे, कोणाला पुरवायचे हे सर्वकाही पाहत असे. इस्राईलच्या संरक्षण दलानुसार, हुसैनी परदेशातून हिज्बुल्ला संघटनेसाठी शस्त्र खरेदीसाठी वाटाघाटी करत असे. हुसैनी हा हिज्बुल्लाच्या टॉप लष्करी संस्था जिहाद कौन्सिलचा सदस्य होता. हिज्बुल्लाच्या दहशतवाद्यांसाठी इराणकडून आगाऊ शस्त्र खरेदी करण्यासाठी देखील हुसैनीचा पुढाकार असायचा. इराणकडून मिळणाऱ्या प्रत्येक शस्त्रांचा हिशोब ठेवायचा. एवढेच नाही तर हिज्बुल्लाच्या कोणत्या यूनिटला कोणते आणि किती शस्त्रे द्यायची याचाही लेखाजोखा त्याच्याकडे असायचा. संघटनेसाठी सतत नवनवीन शस्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी हुसैनी प्रयत्नशील असायचा.

१२० ठिकाणी हल्ले
इस्राईलने काल हिज्बुल्लाने १२० पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ले केले. त्याचवेळी हिज्बुल्लाने देखील इस्राईलवर १३० पेक्षा अधिक रॉकेट डागले. याशिवाय येमेनने इस्राईलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. इस्राईल सैनिकांनी लेबनॉनच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात मोहीम सुरू करणार असल्याचे जाहीर केले. या कारणांमुळेच ‘आयडीएफ’ने लेबनॉनच्या नागरिकांना किनारपट्टीच्या भागापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मासेमारी करणाऱ्यांना देखील समुद्रात ६० किलोमीटरपर्यंत न जाण्याचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT