बीजिंग - कोरोनामुळे (Corona) जगातील अनेक देशांत निर्बंध कसेबसे शिथिल होत असताना, सोशल डिस्टन्सिंग (Social Distencing) अजूनही अनिवार्य असताना आणि मुळात एकत्र येण्याची मर्यादा शेकड्यात असताना वुहानमध्ये (Wuhan) एका कार्यक्रमात तब्बल ११ हजारहून जास्त नागरीकांनी (Public) खचाखच गर्दी केली होती. पदवीदान समारंभासाठी तेवढ्या विद्यार्थ्यांनी (Student) हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. (Housefull Crowd in Wuhan for the Graduation Ceremony)
कोविड-१९ विषाणूचा उमग झाल्याची सर्वदूर शंका असलेले हे शहर त्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले. नेव्ही ब्लू रंगाचा गाऊन आणि पदवीदान समारंभासाठीची खास टोपी घातलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे व्हायरल झाली.
गत वर्षात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. यातील दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे पदवीदान कार्यक्रमास उपस्थित राहता आले नव्हते.
कोरोनाच्या साथीची पहिली नोंद २०१९ च्या अखेरीस चीनच्या मध्य भागातील हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे झाली. एक कोटी दहा लाख लोकसंख्येच्या शहरात त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. गेल्या एप्रिलमध्ये सुमारे ७६ दिवसांच्या खंडानंतर ते शिथिल करण्यात आले. शाळा, महाविद्यालये मात्र जास्त कालावधीसाठी बंद होती. गेल्या वर्षी पदवीदान समारंभांचे प्रमाण मर्यादित होते. वुहान विद्यापीठाचे बहुतांश वर्ग ऑनलाइन पद्धतीने झाले. प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घातले होते.
नवे रुग्ण केवळ २०
जगभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना चीनमधील आकडेवारी नगण्य आहे. मंगळवारी नव्या रुग्णांचा आकडा फक्त २० होता. त्यातील १८ जण परदेशातून परतले होते. केवळ दोन रुग्ण स्थानिक होते, जे दक्षिणेकडील गुआंगडाँग प्रांतात सापडले. अधिकृत माहितीनुसार चीनमधील एकूण रुग्णांचा आकडा अजूनही एक लाखाच्या आत (९१४७१), तर मृतांचा अधिकृत आकडा पाच हजाराच्या आत (४६३६) आहे.
काव्यपंक्तींचा संदर्भ
उसळी घेणाऱ्या माशासाठी समुद्र अमर्याद असतो अशी आशयाची चिनी भाषेतील कविता आहे. प्राचीन काळापासून तिचा संदर्भ दिला जातो. या कार्यक्रमाच्या ठिकाणी याच काव्यपंक्ती लिहिलेला भव्य फलक होता. विद्यार्थ्यांना हाच संदेश देण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.