ग्लोबल

अमेरिकेची उडाली भंबेरी... कशी ते वाचा !

सुबोध कुलकर्णी

अमेरिका म्हणजे वेगवेगळ्या विचारधारांचा "मेल्टिंग पॉट'. तेच अमेरिकेचे वैशिष्टय. पण सध्या अमेरिकेच्या केंद्रीय आणि प्रादेशिक स्तरावर मोठा गोंधळ उडाला आहे. अध्यक्ष ट्रम्पंना अमेरिका लवकरात लवकर पूर्वपदावर आणायची आहे. इथे बेरोजगारीची मोठी चिंता देशभर आहे. अमेरिकेची भांडवलशाही वृत्ती व त्यासोबत येणारी उद्दिष्टेही कोलमडून पडत आहेत. आत्तापर्यंत पंच्चावन हजार मृत्यू आणि 2 कोटी 60 लाख बेरोजगार हे आकडे अमेरिकेचे देश म्हणून भीषण चित्र जगाला दाखवत आहेत.
येत्या नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका आहेत. इथल्या वेगवेगळ्या राज्यांचे प्रमुख वेगवेगळे विचार मांडत आहेत. कुणाला पटकन्‌ सारे सुरळीत करायचे आहे तर कुणाला अजून थोडे थांबायचे आहे. काही राज्यात मर्यादित कामकाज सुरू आहे. आरोग्य सल्लागार आणि राज्यप्रमुख एकाच मंचावर परस्पर विरोधी विधाने करतात आणि जनतेचा अधिकच संभ्रम वाढवतात. कोरोनाने होरपळलेल्या राज्याच्या गव्हर्नरांचा प्रेसिडेंटना उघड उघड विरोध सुरू आहे. दररोज बातम्या बघत असल्यामुळे बेरोजगारांचा फॉर्म भरण्यासाठी लांब-लांब रांगा लागल्या आहेत. तशाच अन्नछत्राच्या बाहेर रांगा. 18-18 तास अन्नाच्या पाकिटांची वाट बघून कंटाळलेले लोक, मानसिक स्थैर्य रहावे म्हणून गाडीत बसूनच बायबल वाचणारे लोक, त्यांचा स्टिम्युलस मनी कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत असलेले लोक, त्यांचे शंभर प्रश्‍न दररोज टीव्हीवर बघणे क्‍लेशदायक आहे.
आमचं आयोवा राज्य कृषिप्रधान. तशी इथे अन्य राज्यांच्या तुलनेत तुरळक लोकसंख्या आहे. तरीही आता इकडे दोन अडीच हजार रुग्ण आणि साठ पासष्ट मृत्यू झाले आहेत. आमच्या पंचक्रोशीत पंधरा वीस मृत्यू झालेत. जवळच्या काही दोन तीन भारतीयांचा मृत्यू अन्य कारणांमुळेच झाला, मात्र त्यांच्यापासून दूरच रहावे लागले. हे दुःखद आणि भीतीदायकही. आम्ही शेतीविषक साधने बनवतो. अत्यावश्‍यक सेवेमुळे मला दररोज कामावर जावे लागते आणि अनेकांशी संपर्कही येतो. मात्र आता मी फेब्रुवारीच्या सुरवातीला जेवढा बेफिकीर होतो तेवढा आता नक्कीच नाही. आता घरातील स्वच्छतेची बंधणे अधिकच काटेकोर झाली आहेत. व्यवस्थापनानेही कामाच्या ठिकाणी खूप काळजी घेतली आहे. मात्र इथेही अमेरिकेच्या स्वभावाचे प्रतिबिंब उमटले आहे. काही मास्क-ग्लोव्हजसह टाईट तर काहींनी अजूनही कोरोनाला भीक घालायचीच नाही असं ठरवलंय. ते मोकाट फिरतात.
सध्या जीमला टाळे असल्याने घरगुती व्यायाम साधनांची इथे ऑनलाईन खरेदी वाढली आहे. तीही वेळेवर मिळत नाहीत. अनेक शेजारी रस्त्यांवर व्यायाम करताना दिसतात. सायकलिंग, पळणे जोर धरत आहे. एकूणच "सर सलामत तो पगडी पचास' या न्यायाने प्रत्येक जण व्यायामाची दक्षता घेतोय; कारण प्रतिकार क्षमता टिकवली पाहिजे.
अमेरिकन मंडळी पराकोटीचे स्वातंत्र्यप्रिय. त्यामुळे इथे लॉकडाऊनच्या विरोधातही आंदोलने होतात. परवा डिपार्टमेंटल स्टोअरला गेलो तर तिथे काळी, गोरी, तपकिरी, पिवळी अशी अनेक रंगाची माणसे निर्धास्तपणे फिरत होती. त्यांची मुलंही तशीच. जणू काही त्यांच्याकडे कवच कुंडलेच आहेत. स्टोअरमधील ध्वनिक्षेपकावरून सतत सोशल डिस्टन्सिंगबद्दलच्या सूचनांचा घोष सुरू होता, मात्र त्या कोण ऐकणार?
स्टोअरमधील सर्व स्वस्त पदार्थ आधीच संपलेले दिसत होते. मटणाची पाकिटेही संपत होती कारण तिथल्या आजूबाजूच्या मीट प्रोसेसिंग प्लॉन्टमध्ये कोरोना बाधित लोक सापडल्यामुळे ते बंद होत आहेत. तर ताजी फळे फळभाज्या तुलनेने महाग असल्याने त्याला उठाव नव्हता. अमेरिकेतील वाढत्या गरिबीचे-बेरोजगारीचे हे चित्र दर्शनच घडवत होते. हेच चित्र अधिक कठोरपणे मांडणाऱ्या अनुभवाला मी स्टोअरमधून बाहेर पडताना सामोरे गेलो. एक मध्यमवयीन बाई माझ्याजवळ आली आणि मला स्पर्श करून म्हणाली, ""मी चार वर्षाच्या मुलाची आई आहे. जॉब गेल्यामुळे माझ्याजवळ आता काही उरलेले नाही. मला काही पैसे असतील तर दे.'' पॅंटचा खिसा उलटा करून ती केविलवाण्या नजरेने त्यातील काही चिल्लर मला दाखवत होती. अमेरिकेत कधी अशी भीक मागितली जात नाही. त्यातही अमेरिकन स्टाईल असते. एक पाटी-बोर्ड लिहून लोक चौकात, रस्त्याच्या कडेला उभे असतात. मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडून अगतिकपणे ती भीक मागत होती. तिची एकंदर स्थिती-वेशभूषा बघून तिच्या बोलण्यात तथ्य वाटत होते. प्रारंभी मी सुटे पैसे नाहीत असं सांगून वेळ मारून नेली, मात्र गाडीत जाऊन असतील तेवढे सुटे पैसे आणून मी तिच्या स्वाधीन केले. तिच्या हाताला स्पर्श झाला होता त्यामुळे गाडीत आल्यानंतर मी भरपूर सॅनिटायझर्स टाकून हात धुतले. मात्र महासत्ता अमेरिकेतील हा अनुभव मला आतून वेदना देत होता.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: मुंबई इंडियन्सने 'या' अनकॅप्ड खेळाडूसाठी वापरलं एकमेव RTM कार्ड

SCROLL FOR NEXT