Child abuse Google file photo
ग्लोबल

लहान मुलांना वाचवा; जगभरात लैंगिक शोषण आणि तस्करी होते तरी कशी?

आतापर्यंतच्या संशोधनानुसार, वयात येण्यापूर्वी दहापैकी एका मुलावर लैंगिक अत्याचार होतात. यात मुलींचं प्रमाण १४ टक्के, तर मुलांचं ४ टक्के आहे.

वृत्तसंस्था

आतापर्यंतच्या संशोधनानुसार, वयात येण्यापूर्वी दहापैकी एका मुलावर लैंगिक अत्याचार होतात. यात मुलींचं प्रमाण १४ टक्के, तर मुलांचं ४ टक्के आहे.

जगभरात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना घडत असतात. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. लहान मुलांचं अपहरण करण्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण अलीकडील काळात त्यांच्यावर होणाऱ्या शारीरिक छळांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अपहरण करण्यात आलेल्या लाखो मुलांना अज्ञात स्थळी, भूमिगत ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात.

लहान मुलांची तस्करी केली जाते आणि त्यांचे लैंगिक शोषण केले जाते, याबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. अशा घटनांच्या निषेधार्थ लॉस एंजिलिस, लंडन अशा मोठ्या शहरांमध्ये रॅली काढण्यात आल्या. सेव्ह अवर चिल्ड्रन आणि एंड चाईल्ड ट्राफिकिंग अशा हॅशटॅग असलेले शर्ट, प्लेकार्ड धारण केलेले अनेकजण यात सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार, शोषण किंवा तस्करीचे बळी ठरलेल्यांना यामुळे भावनिक आधार मिळतो. पण चुकीच्या माहितीद्वारे लोकांना डिजिटल सैनिक बनवले जात आहे, ही सध्याची शोकांतिका आहे. बाल लैंगिक अत्याचार आणि मानवी तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या ते विरोधात काम करत आहेत, याची कल्पना बऱ्याच जणांना नसते.

बाल लैंगिक अत्याचाराबद्दलचं सत्य

मुलांवरील लैंगिक अत्याचाराची आकडेवारी कधीच अचूक नसते. ४० टक्क्यांहून कमी पीडित असे आहेत, ज्यांच्याकडून लहानपणी गैरवर्तन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील रॉयल कमिशनने स्त्रिया सुमारे २०व्या वर्षी तर पुरुष २५व्या वर्षी लैंगिक अत्याचारासंदर्भात खुलासा करतात. तर काहीजण याबाबत कधीच बोलताना दिसत नाहीत, असे म्हटले आहे. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, वयात येण्यापूर्वी दहापैकी एका मुलावर लैंगिक अत्याचार होतात. यात मुलींचं प्रमाण १४ टक्के, तर मुलांचं ४ टक्के आहे. सात मुलींपैकी एक मुलगी बालपणीच लैंगिक अत्याचाराची शिकार झालेली असते, तर २५ मुलांपैकी एका मुलाचे लहानपणी लैंगिक शोषण झालेले असते.

मुख्यत: व्यसन करणारी मुले, पालकांच्या ओळखीतील किंवा विश्वासू लोकांपैकी एक, नातेवाईक, सासऱ्यांकडून लैंगिक शोषण केले जाते. १५ टक्के पेक्षा कमी प्रकरणांमध्ये गुन्हेगार हा एक अनोळखी व्यक्ती असल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकन ब्युरो ऑफ जस्टिस स्टॅटिस्टिक्सच्या २००० च्या अभ्यासानुसार, १७ वर्षांखालील सर्व ज्ञात पीडित ७.५ टक्के महिला आणि ५ टक्के पीडित पुरुषांवर अपरिचित व्यक्तीने अत्याचार केल्याचे आढळले. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीत असे आढळले आहे की, ११.५ टक्के मुली आणि १५ टक्के मुलांचे १६ वर्षांपेक्षा कमी वय असताना लैंगिक शोषण करण्यात आले होते.

पार्क किंवा शॉपिंग सेंटरमध्ये मुलांचा विनयभंग होण्याचा धोका वाढतो. दुर्मिळ प्रकरणांमध्ये मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली जाते. २००७ साली एका तीन वर्षीय मॅडलेन मॅक्कन झालेले अपहरण हे प्रकरण अनेकांच्या आठवणीत राहिले आहेत. वर्षाकाठी कोट्यावधी मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांची तस्करी केली जात आहे. अमेरिकेत दरवर्षी ८ लाख मुले गायब होतात, तर जगभरात दरवर्षी १ कोटी ९० लाख मुले गायब होत आहेत.

वास्तवात तस्करी नक्की किती

श्रीमंत राष्ट्रांत कोट्यवधी मुलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी अपहरण केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, पण लहान मुलांची तस्करी ही चिंता वाढवणारी बाब आहे. एखाद्याचे शोषण करण्यासाठी शक्तीचा गैरवापर करणे हा तस्करीचा एक भाग आहे. गरिबी, आर्थिक परिस्थिती, लैंगिक असमानता, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. विविध देशांमधील पोलिसिंग, छुपे गुन्हे, रिपोर्टिंगमधील गळती आणि आकडेवारीच्या संकलनात नसलेला एकसारखेपणा यामुळे वास्तवात तस्करी किती झाली, याचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 'ग्लोबल रिपोर्ट ऑन ट्रॅफिकिंग इन पर्सन्स'मध्ये फक्त नोंदवलेल्या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी २५ हजार पेक्षा जास्त प्रकरणे आढळत नाहीत, असे त्यामध्ये नमूद केले आहे.

पण या विषयात संशोधन करणाऱ्या संशोधकाचे म्हणणे आहे की, जगभरात २ कोटी १० लाख जणांची तस्करी केली जाते. त्यापैकी १ कोटी ६० लाख हे कामगार वर्गातील आहेत, तर ३० लाखजण हे १८ वर्षांखालील वयोगटातील आहेत. सेक्ससाठी जवळपास ५० लाखजणांची तस्करी केली जाते. यामध्ये महिलांचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यापैकी ७० टक्के महिला या आशियामधील आहेत. युरोप आणि मध्य आशियातील १४ टक्के, आफ्रिका ८ टक्के, अमेरिका ४ टक्के तर अरब राष्ट्रांमधील १ टक्के प्रमाण आहे. १८ वर्षांखालील मुलींची संख्या लाखाच्या घरात आहे.

सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या पीडित कुटुंबातील मुलींना चांगले काम, चांगले जीवन याबाबतची खोटी आश्वासने दिली जातात. आणि त्यांची तस्करी केली जाते. तस्करीनंतर त्या मुलींवर दबाव आणला जातो, त्यांना लैंगिक कामे करण्यास भाग पाडले जाते. नग्न मसाज आणि सेक्स करण्यासाठी १४ ते १८ वयोगटातील मुलींना सांगितले जाते, अशी माहिती एका पीडितेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT