Hunger sakal
ग्लोबल

Bangkok News : दक्षिण आशियात भूकेची समस्या अद्यापही कायम; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

आशियामध्ये भूक ही मोठी समस्या असून कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत २०२२ मध्ये साडे पाच कोटी अधिक लोक कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

पीटीआय

बँकॉक - बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक वर्षांपासून अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत उपाययोजनांबाबत चर्चा केली जात असताना अद्यापही ही समस्या कायम असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून आले आहे. या अहवालानुसार, आशियामध्ये भूक ही मोठी समस्या असून कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत २०२२ मध्ये साडे पाच कोटी अधिक लोक कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

या अहवालात अन्न पुरवठा, अन्नधान्याचा वापर आणि पोषक अन्नाची आवश्‍यकता या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. याचा किती परिणाम देशाच्या प्रगतीवर आणि राहणीमानाच्या दर्जावर होतो, हे शोधणे हा अहवालाचा मुख्य हेतू होता. अहवालातील माहितीनुसार, दक्षिण आशियामध्ये भूकेची समस्या मोठी असून अनेक लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी अन्न मिळते. २०२१ मध्ये कुपोषित व्यक्तींचे प्रमाण ८.८ टक्के होते, ते २०२२ मध्ये घटून ८.४ टक्के झाले असले तरी, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा या लोकांच्या पालनपोषणासाठी खर्च होतो.

भूकेच्या समस्येमागील कारणे

  • लोकांमध्ये अन्न खरेदी करण्याची क्षमता नसणे

  • पैसे कमी असल्याने कमी दर्जाचे अन्न खाणे

  • महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी अन्न मिळणे

  • इंधन, अन्न, खतांच्या किमती वाढल्याने अडथळे

  • अन्नपुरवठ्याचे असमान वितरण

अन्नसुरक्षेची समस्या

  • २.४ अब्ज : लोकांना अपुरे अन्न उपलब्ध

  • ४२ टक्के : महिलांसमोर अन्नसुरक्षेचे संकट

  • ३७ टक्के : पुरुषांसमोर संकट

  • ३/४ : जणांना पोषक अन्न परवडत नाही (आफ्रिका)

कुपोषणाचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

  • ९.२ : जगाची सरासरी

  • १६ : दक्षिण आशिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT