child child
ग्लोबल

शाळेत मुलाने लिहिलेले वाक्य पाहून शिक्षिकेला बसला धक्का

जेव्हा शिक्षिकेने कॉल केला तेव्हा असे वाटले की कदाचित मुलाने काही खोडसाळपणा केला आहे

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या जगात सर्वकाही झपाट्याने बदलत आहे. पूर्वीच्या तुलनेत तरुणांच्या आवडीनिवडी आणि उद्दिष्टे खूप बदलली आहेत. तसेच मुलांच्या अभ्यासाची शैलीही बदलली आहे. अशीच एक मजेशीर घटना इंग्लंडमधून समोर आली आहे. इंग्लंडमध्ये एक मुलगा पहिल्यांदा शाळेत गेला. पहिल्याच दिवशी (school first day) त्याने वहीत असे वाक्य लिहिले की शिक्षिकेचे डोके (teacher shocked) फिरले. एवढेच नाही तर जेव्हा मुलाच्या पालकांनी शिक्षिकेकडून ऐकले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.

‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील सॉमरसेट येथे राहणाऱ्या क्रिस्टी जॉर्डन स्मिथने पाच वर्षांच्या मुलाला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. शाळेत पोहोचल्यावर मुलाचे स्वागत करण्यात आले. यानंतर त्याची आई घरी परतली. शाळेत मुलाला शिक्षिकेने काही लिहिता किंवा वाचता येते का? असे विचारले. त्यावर मुलाने होकारार्थी मान हलवली.

शिक्षिकेने सांगितल्यानंतर मुलाने वही व पेन बॅगेतून बाहेर काढली. यानंतर मुलाने लिहायला सुरुवात केली. त्याने आयुष्यातील पहिले वाक्य लिहिले ‘मला वाईनं आवडते’ (I Like Wine). हे बघितल्यानंतर शिक्षिकेने तात्काळ मुलाच्या आईला फोन करून परत शाळेत बोलावून घेतले आणि मुलाने लिहिलेले वाक्य दाखवले. हे बघून मुलाच्या आईलाही आश्‍चर्य वाटले.

वाईनं काय आहे हे माहीत आहे का?

जेव्हा शिक्षिकेने कॉल केला तेव्हा असे वाटले की कदाचित मुलाने काही खोडसाळपणा केला आहे. ज्यामुळे शिक्षिकेने शाळेत बोलावले असेल. मात्र, आई वर्गात पोहोचल्यावर हा प्रकार समोर (students wrote word) आला. यानंतर ती महिला मुलाला घेऊन घरी परतली. तिने मुलाला तुला वाईनं काय आहे हे माहीत आहे का? असे विचारले. तेव्हा मुलाने माहीत नसल्याचे सांगितले.

आई-वडील पीत नाही दारू

ती महिला स्वतः किंवा तिचा नवरा घरात दारू पीत नाही. त्यामुळेच मुलगा घरात रोज दारूच्या बाटल्या किंवा त्यांची लेबले पाहतो असेही नाही. ती महिला आता आपल्या मुलाला याचा अर्थ समजावून सांगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT