Iceland Volcanic Eruption : आइसलँडमध्ये डिसेंबर महिन्यापासून ज्वालामुखींचा सातत्याने उद्रेक होतो आहे. देशात बऱ्याच ठिकाणी जमीन दुभंगली असून, मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि मॅग्मा बाहेर येत आहे. यामुळे देशात स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. या भागामधील इतर ज्वालामुखींवर आता वैज्ञानिक लक्ष ठेऊन आहेत.
लॅन्सेस्टर विद्यापीठातील डॉ. डेव्ह मॅकगार्व्हे यांनी सांगितलं, की गेल्या वेळी जेव्हा असे उद्रेक झाले, तेव्हा त्यांची सुरुवात पूर्वेकडून झाली, आणि पुढे ते पश्चिमेकडे येत गेले. यंदा हे उद्रेकांचं चक्र 2021 ससालापासूनच सुरू झालं होतं. मात्र, हे अगदी मध्यापासूनच सुरू झालं आहे. त्यामुळे याबाबत कोणताही अंदाज बांधणं शक्य होत नाहीये असं डेव्ह म्हणाले.
सध्या डिसेंबरमध्ये झालेले उद्रेक हे पश्चिमेकडे होते. हे उद्रेक आधीच्या कोणत्याही नियमांमध्ये बसत नाहीयेत. त्यामुळे जमीनीखाली किती मॅग्मा आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. हे चक्र कधी थांबेल याबाबतही आम्हाला सध्या कल्पना नाही. (Iceland Volcanos)
आज (10 फेब्रुवारी) पहाटे सहा वाजेपासून पुन्हा जमीनीखालून लाव्हा बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शहरांमधील रस्त्यांना तडे गेले आहेत. शहरांमध्ये गरम पाणी पुरवणाऱ्या पाईपलाईनचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कित्येक ठिकाणी तर तब्बल 3,000 फूट उंचीपर्यंत लाव्हाची राख उडत असल्याचं दिसत आहे.
नोव्हेंबर महिन्यापासूनच ग्रिंडाविक नावाच्या शहरातून लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. आइसलँडमध्ये 30 पेक्षा अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत. (Iceland Volcanic Cycle)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.