World Deaf Day 2021 Google
ग्लोबल

World Deaf Day 2021: इचलकरंजीची पोरं लय हुशार! 13 कर्णबधिरांचे ॲनिमेशनमध्ये करिअर

अर्चना बनगे

कोल्हापूर :  दिव्यांगावर मात करीत इचलकरंजीतील (Ichalkaranji) तब्बल १३ कर्णबधिर (Deaf Children) मुलांनी  करीअरचे आपले वेगळे विश्व निर्माण केले आहे. या मुलांनी अॅनिमेशनमध्ये कौशल्य मिळवीत त्या आधारावर आपले करियरचे जीवनचक्र सुरु ठेवले आहे.  हे फक्त शिक्षणामुळे घडले . मात्र हे शिक्षण घेणे सुध्दा या मुलांना मोठे आव्हान असते. हे आव्हान अनेक सेवाभावी संस्था स्विकारून या मुलांच्या पंखात बळ भरण्याचे काम करत आहेत. यातूनही खडतर प्रयत्न करत विश्वाच्या पलीकडे जात नेत्रदीपक कामगीरी या मुलांनी केली आहे. आज जागतिक कर्णबधीर दिवस (World Deaf Day 2021) या दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.

कर्णबधिर मुलांच्या शिक्षणांचा प्रवास  हा खडतर असतो. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांच्या पूढे खूप मोठे चॅलेंज असते.

कर्णबधिर मुलांच्या शिक्षणांचा प्रवास  हा खडतर असतो. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांच्या पुढे खूप मोठे चॅलेंज असते. या मुलांना एेकण्याची क्षमता कमी असल्यामुळे भाषेचा अडथळा खूप येतो. त्यामुळे यांची सुरवातीची पाच वर्षे ही अंगणवाडीत जातात. अक्षरज्ञान, अंकज्ञान, रंगाची ओळख करण्यात यांना वेळ लागतो. नाॅर्मल मुल अंगणवाडीत जाऊ पर्यत त्याच्याकडे किमान ५० हजार शब्दाचा संग्रह झालेला असतो. मात्र या मुलांकडे एेकण्याची क्षमता कमी असल्या कारणाने त्यांना भाषेचा अडथळा येतो.  पुढे  जाऊन शिक्षण घेत असताना विलंब होतो. घरात आणि शाळेत एकच भाषा असेल तर हे मूल लवकर डेव्हलप होते.

कशी असते शाळा

सुरवातीला यांची पाच वर्षे ही अंगणवाडीत जातात. त्यानंतर पहिली ते सातवी व पूढे १० पर्यत शिक्षण घेऊन ही मुले काम करू शकतात. अगदीच पुढे शिकायची इच्छा असली तरी इंग्रजी या विषयाची अडचण निर्माण होतो. ४० ते ४५ डेसीबल ऐकण्याची क्षमता असणारी मुले पदवी पर्यत शिक्षण घेऊ शकतात. ही मुले चित्रकला, शिवण, भरत काम,  या विषयात तरबेज असतात.

पालकांचा सहभाग

खरंतर असे मुल स्विकारणं अनेक पालकांना जड जाते. मात्र  आज बरेच पालक  सज्ञान झालेली आहेत. अशा विशेष मुलांसाठी मेहनत घेऊन त्यांच्यावर काम करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापुरातील रेशमा माने. त्यांची मुलगी खेळामध्ये तरबेज आहे. तीचे खेळात करीअर व्हावे यासाठी त्या धडपडत आहेत.

या मुलानी घडविले करियर

इचलकरंजी येथील दि न्यू हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग आहेत. या वर्गांमधील तेरा मुलांनी ॲनिमेशन मध्ये आपले करिअर घडवले आहे सध्या ही मुले श्रीकांत जाधव यांच्याकडे चित्रपट आणि अॅनिमेशन चे काम करतात. यामध्ये सत्यजित कांबळे, प्रसाद पवार, विठ्ठल जावळे, अनिकेत कुंभोजे, साहिल नदाफ, भारत नैराळे, अक्षय विधाते, सोहेब, अभिषेक नावलगी, सुरज सावंत,साहिल धनवडे, सुदिप पवार, हेमंत रुग्गे, स्वप्नील पाटील या मुलांचा समावेश आहे.

पालकांनी योग्य वयात आपल्या पाल्याचे निदान करून घेऊन या मुलांना योग्य वयात शाळेत घातले तर अशी मुले वेगवेगळ्या क्षेत्रात लवकर प्रगती करतात. यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.

संगिता बिरनाळे , विशेष शिक्षक, इचलकरंजी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT