Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्राइलचे खतरनाक 'आर्मी डॉग्स' करतायत हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा; व्हिडिओ आला समोर

इस्राइलचे खतरनाक 'आर्मी डॉग्स' करतायत हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा

अंकिता खाणे (Ankita Khane)

हमासने गाझामध्ये बोगद्यांचे जाळे किती प्रमाणात विणले आहे, हे आता कोणापासून लपून राहिलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, बोगद्यांच्या या चक्रव्यूहामुळेच इस्राइली सैन्य गाझावर थेट हल्ले करण्याऐवजी सावधपणे पुढे जात आहे. या बोगद्यांचे जाळे किती लांब आहे, हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे हमासचा हा चक्रव्यूह मोडून काढण्यासाठी इस्राइली लष्कराने नवी युक्ती शोधून काढली आहे.

इस्राली आर्मी (आयडीएफ) आता पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या लढवय्यांवर आपले मोकाट कुत्रे सोडत आहे, जे हमासच्या सैनिकांना शोधून मारत आहेत. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याच्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट दिसून आली .नेतन्याहू यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते ओफिर गेंडेलमन यांनी X (पूर्वी ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक बोगदा दिसत आहे, ज्यामध्ये गडद अंधार आहे.एक भयंकर कुत्रा बोगद्यात वेगाने धावत आहे, त्याच्या पाठीला कॅमेरा जोडलेला आहे.

कुत्र्यासमोर हमासचा एक सेनानीही धावत असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. काही वेळातच कुत्र्याने हमासच्या फायटरवर झडप घेतली. हमास सेनानी मदतीसाठी जोरजोरात याचना करत राहतो, पण कुत्रा त्याला चावत राहतो.बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते ओफिर गेंडेलमन यांनी व्हिडिओ शेअर केला आहे आणि दावा केला आहे की हा व्हिडिओ गाझा पट्टीचा आहे, जिथे IDF चे भयंकर कुत्रे हमासच्या सैनिकांचा पाठलाग करून त्यांना मारत आहेत.

इस्राइलने आपली रणनीती बदलली!

युद्धाच्या काळात सुरुवातीपासूनच उंच इमारतींवर हल्ले करणाऱ्या इस्राइलने आपल्या रणनीतीत थोडासा बदल केल्याचे दिसते. इस्राइली हवाई दल आता विशेषत: त्या संरचनांना लक्ष्य करत आहे ज्यांच्या खाली हमासच्या मुलांनी लांब बोगदे केले आहेत. इस्राइली लष्कर हे बोगदे नष्ट करण्यात कोणतीही सवलत देत नाहीत, यासाठी त्यांना रुग्णालय किंवा शाळेच्या इमारतीला लक्ष्य करावे लागले तरीदेखील ते सवलत देत नाहीत.

मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे

7 ऑक्टोबर रोजी इस्रावर हमासच्या दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या या युद्धाने भीषण रूप धारण केले आहे. इस्राइलची प्रत्युत्तरादाखल कारवाई वाढत असल्याने मृतांचा आकडाही वाढत आहे. या युद्धात आतापर्यंत पॅलेस्टाईन आणि गाझामधील 9 हजार 488 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3,900 मुलांचाही समावेश आहे. त्याच वेळी, इस्राइलमध्ये मृतांची संख्या 1500 च्या पुढे गेली आहे.

इस्राइली गुप्तचर संस्था एआयची मदत घेत आहे

हे युद्ध संपुष्टात आणण्यासाठी, इस्राली गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी इंटेलिजन्स बँक यांचा वापर करत आहेत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संभाव्य दहशतवादी लक्ष्यांचे तपशील गोळा करत असते. ही AI आधारित लक्ष्य बँक अतिशय आधुनिक आहे. इस्त्राइली सैन्याने पहिल्याच दिवशी हमासच्या लढवय्यांचे 150 बोगदे नष्ट केले. गेल्या एक महिन्याच्या युद्धात इस्राइलने एआय आणि गुप्तचर माहितीच्या आधारे 90 टक्के लक्ष्य नष्ट केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT