इस्राइलच्या गाझा पट्टीत हमासच्या लक्ष्यांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झाले. हमासच्या हल्ल्यात इस्राइलमध्ये 1400 लोक मारले गेले.
इस्राइलने गाझामध्ये हमासचे कंबरडे मोडले आहे. गाझातील बहुतांश भाग इस्राइली लष्कराने आपल्या ताब्यात घेतला आहे. आता इस्राइली सैनिक गाझा येथील हमासच्या संसदेत पोहोचले आहेत. इस्राइली लष्कराने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये इस्राइली सैनिक हमासच्या संसदेत आपला झेंडा फडकवताना दिसत आहेत.
इस्राइली लष्कराचे सैनिक हमासच्या संसदेत स्पीकरच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तसेच इस्राइलचा ध्वज फडकवला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, इस्राइली सैनिक योजनेनुसार काम करत आहेत आणि गुप्तचर माहितीचा वापर करून ते हमासला अचूकपणे संपवत आहेत. यावेळी हवाई, सागरी आणि भूदल सैन्य समन्वयाने मोहिमा राबवत आहेत.
हमासने गाझावरील नियंत्रण गमावले - इस्राइल
ते म्हणाले, हमासमध्ये आयडीएफला रोखू शकणारी शक्ती नाही. IDF प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत आहे. हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे, दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत, नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत आणि त्यांचा सरकारवर विश्वास नाही.
इस्राइली सैन्याने म्हटले आहे की, IDF ने हमासच्या 24 बटालियनपैकी 10 बटालियन प्रभावीपणे नष्ट केल्या आहेत. आयडीएफनुसार, हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. हमासने आपल्या 30,000 सैनिकांसह हे युद्ध सुरू केले. हमासचे सैनिक 5 ब्रिगेड आणि 24 बटालियनमध्ये विभागले गेले. प्रत्येक बटालियनमध्ये 1000 पेक्षा जास्त सैनिक होते.
7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू
7 ऑक्टोबरलाच हमासच्या सैनिकांनी इस्राइलवर हल्ला केला. यामध्ये 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासने 240 लोकांना ओलीस ठेवले होते. तेव्हापासून इस्राइल 5 आठवड्यांपासून गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. तसेच गेल्या १५ दिवसांपासून इस्राइली लष्कराचे ग्राउंड ऑपरेशन सुरू आहे. इस्रायइने हमासचे हजारो तळ आणि बोगदेही नष्ट केले आहेत. यामध्ये आतापर्यंत 11000 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.