इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केलंय की पाकिस्तानची परराष्ट्र नीती संपूर्णपणे बीजिंगवर अवलंबून आहे. रविवारी पाकिस्तान-चीनच्या संबंधांचा उल्लेख कर इम्रान खान यांनी म्हटलं होतं की, इस्लामाबादच्या परराष्ट्रनीतीचा आधारभूत घठक हा परस्परातील संबंध आहे. 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या रिपोर्टनुसार दोन्हीही देशांनी जोर देऊन म्हटलंय की, महत्त्वाच्या मुद्यांवर ते एकमेकांच्या हितसंबंधांचं समर्थन करतील.
रविवारी शी जिनपिंगशी भेटले इम्रान खान
इम्रान खान यांनी रविवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलंय की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या मुद्यांवर खोलात जाऊन आपले विचार व्यक्त केले. याशइवाय बैठकीमध्ये प्रांताची अवस्था तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यांनी म्हटलंय की, पाकिस्तानच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासामध्ये सीपीईसीचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
बैठकीनंतर संयुक्त वक्तव्य जारी
बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त वक्तव्यामध्ये म्हटलंय की, पाकिस्तान आणि चीन एकमेकांसोबतच्या राजकीय संबंधांला पुरक वागत आहेत. इस्लामाबादने चीनच्या 'वन चायना पॉलिसी' तसेच साऊथ चायना सीचेही समर्थन करण्याची घोषणा केली आहे.
चीनकडून पाकिस्तानसाठी प्रथम स्थान - ली
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी म्हटलंय की, शेजाऱ्यांसोबतच्या कुटनीतीमध्ये चीनसाठी पाकिस्तान 'प्राथमिक' स्थानावर आहे. इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर ली यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी खान यांनी त्यांना आश्वासन दिलंय की, त्यांचं सरकार चीनच्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या देशातील प्रकल्पांची सुरक्षा करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. चीनच्या पंतप्रधानांनी म्हटलयं की, चीन नेहमीच पाकिस्तानसोबत आपले जवळचे राजकीय संबंध टिकवण्यास महत्त्व देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.