Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना पुन्हा एकदा पूर्व पाकिस्तानची आठवण झाली आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खान पूर्व पाकिस्तानबद्दल बोलताना दिसत आहे.
इम्रान खान म्हणतात "मी आज पुन्हा तुम्हाला पूर्व पाकिस्तानची आठवण करून देऊ इच्छितो. पूर्व पाकिस्तान तयार होताना मी पाहिलंय. मार्च 1971 मध्ये मी अंडर-19 मॅच खेळण्यासाठी तिथे गेलो होतो. मला अजूनही आठवतंय की त्यांच्या मनात पाकिस्तानविरुद्ध किती द्वेष निर्माण झाला होता.
इम्रान खान यांचं हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना पाकिस्तानचे दुसरे शेख मुजीबुर रहमान म्हटले जात आहे. इम्रान खान यांनीही लष्कराविरोधात उघडपणे बंड केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सध्याच्या शाहबाज सरकारविरोधातही त्यांनी अघोषित युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती आहे. इम्रान खान या दोघांविरुद्ध राजकीय आणि कायदेशीर युद्ध लढत आहेत.
पाकिस्तानमध्ये हिंसाचार आणि दगडफेक सुरूच
सोमवारी पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंसाचार आणि तोडफोड दिसून आली. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातून अनेक लष्करी तळांवर दगडफेक केली. इम्रान खान यांनी लष्करप्रमुख सय्यद जनरल असीम मुनीर यांच्यावर उघडपणे हल्लाबोल करत, पाकिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करू नका असं म्हटलंय.
त्यामुळे पाकिस्तानातील परिस्थिती पाहता इम्रान खान यांची तुलना शेख मुजीबूर रहमान यांच्याशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी स्वतःची तुलना शेख मुजीबुर रहमान यांच्याशी केली होती. ते म्हणाले होते की, ज्या प्रकारे ते पाकिस्तानी लष्कराशी लढले होते, त्याच पद्धतीने आता मलाही लढावं लागणार आहे.
इम्रान खान म्हणाले, लष्कराने ज्या चुका 1971 मध्ये केल्या होत्या त्याच चुका आजही त्यांच्याकडून होत आहेत. लष्कराच्या अत्याचारामुळे पूर्व पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेश नकाशावर आल्याचे इम्रान खान यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. दोन्ही परिस्थितींमध्ये फरक नाही. त्यावेळीही लष्कर अत्याचार करत होते आणि आताही लाठ्या-काठ्यांचा अत्याचार सुरूच आहे.
शेख मुजीबुर रहमान कोण होते?
शेख मुजीबुर रहमान यांना बंगबंधू असंही म्हटलं जातं. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराशी लढून त्यांनी आपला देश बांगलादेश नकाशावर आणला. पाकिस्तानच्या फाळणीनंतर ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यावेळी याह्या खान हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते, ज्यांच्या विरोधात शेख मुजीबुर रहमान यांनी आघाडी उघडली होती. बांगलादेश निर्माण करण्याच्या शेख मुजीबूर रहमान यांच्या मोहिमेला भारताने पाठिंबा दिला होता.
शेख मुजीबुर रहमान यांनी पाक लष्करप्रमुख याह्या खान यांच्या ऑपरेशन सर्चलाइटला विरोध केला होता. या मोहिमेअंतर्गत बांगला भाषिक लोकांवर अत्याचार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. शेख मुजीबुर रहमान याह्याखानच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी भाषेच्या नावावर पाकिस्तानचे बांगलादेशचे विभाजन केले. एका आकडेवारीनुसार बांगलादेशच्या या स्वातंत्र्ययुद्धात 30 लाख लोक मारले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.