Pakistan PM Imran khan सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

Imran Khan: अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी इम्रान खान यांची मोठी चाल; म्हणाले...

अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी इम्रान खान यांनी मोठी चाल खेळली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला असून रविवारी या अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. परंतु त्यापूर्वीच इम्रान खानने मोठी चाल खेळली आहे. त्याने आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून प्रदर्शन करायला सांगितले आहे. 2018 मध्ये इम्रान खान सत्तेत आले होते. इम्रान खान यांनी देश नीट न चालवल्यामुळे आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (Pakistan PM Imran Khan's big move before the vote on the no-confidence motion)

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली अर्थात संसदेत रविवारी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदानही होणार आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पार्टीने 342 सदस्य संख्या असलेल्या पाकिस्तानी संसदेतील बहुमत गमावलं आहे. त्यांच्या सहयोगी पक्षांनी समर्थन माघारी घेतलं आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्या पक्षातील काही सदस्यही विरुद्ध मतदान करण्याची चर्चा करणार असल्याचे कळत आहे.

काय म्हणाले इम्रान खान-

इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यास सांगितलं आहे. त्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानबाहेरून कट रचला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, "स्वतंत्र आणि मुक्त पाकिस्तानसाठी तुम्ही या मतदानाला विरोध करावा." अमेरिका याबाबतीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला. इम्रान यांना वॉशिंग्टन येथे पाकिस्तानी राजदूतांमार्फत एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या रेकॉर्डींगबद्दलचं एक विस्तृत पत्र मिळालं. त्यामध्ये इम्रान यांनी पद सोडल्यास दोन्ही देशांतील संबंध सुधारतील असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT