Hindu Girl Priya Kumari Abducted In Pakistan Esakal
ग्लोबल

Hindu's In Pakistan: पाकिस्तानात हिंदूंची फरफट सुरूच, सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात अल्पसंख्याक रस्त्यावर

Hindu Girl Abducted In Pakistan: HRFP ने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन, हिंदू, अहमदिया, शीख आणि इतर समुदायातील अनेक लोक गेल्या काही महिन्यांत विविध हल्ल्यांना बळी पडले आहेत.

आशुतोष मसगौंडे

पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू अल्पसंख्याकांवर सातत्याने आत्याचार होत आहेत. धर्मांतर आणि मुलींच्या अपहरणाच्या बातम्या पाकिस्तानातून सतत येत असतात.

2021 मध्ये हिंदू मुलगी प्रिया कुमारीचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले होते. मात्र तिच्या तपासाबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही यश आले नाही. त्यामुळे डेरा मुराद जमाली शहरात हिंदूंनी मोठे आंदोलन केले.

या प्रकरणावरून सध्या पाकिस्तानातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याविरोधात हिंदूंनी मोर्चे काढत आक्रोश व्यक्त केला.

दरम्यान या तरुणीच्या तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याने डेरा मुराद जमाली येथील हिंदू समुदायाच्या सदस्यांनी आणि व्यापाऱ्यांनी अपहरणाचा निषेध करत हिंसक आंदोलन केले.

डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिया कुमारीला शोधण्यात आणि तिची सुटका करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने आंदोलकांनी निराशा व्यक्त केली. मुखी मानक लाल आणि सेठ तारा चंद यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी फेरी काढली. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.

दरम्यान प्रिया कुमारी प्रकरणी, सिंध प्रांताच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार तीन आठवड्यांच्या आत अहवालासह निष्कर्ष सादर करण्यासाठी संयुक्त तपास पथकाची स्थापना केली आहे.

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने (NCRC) या प्रकरणाची आधीच दखल घेत तपास सुरू करण्यासाठी पोलिस विभागाला पत्र लिहिले होते.

जर या मुलीचा तपास लवकर लागला नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तान (HRFP) ने देखील देशातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक छळाचा तीव्र निषेध केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे.

HRFP ने सांगितले की, ख्रिश्चन, हिंदू, अहमदिया, शीख आणि इतर समुदायातील अनेक लोक गेल्या काही महिन्यांत विविध हल्ल्यांना बळी पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT