नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील अभुतपूर्व परिस्थितीमुळे राजधानी काबूलमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताला परवानगी मिळाली आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात NATO नं ही परवानगी दिली आहे. सध्या नाटोनं काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण मिळवलं आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
दररोज दोन विमानांद्वारे अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात परत नेण्यास नाटोनं भारताला परवानगी दिली आहे. २५ विमानांचं सध्या नाटोकडून संचालन सुरु आहे. सध्या आपल्या नागरिकांना बाहेर काढणं तसेच हत्यारं आणि उपकरणं नेण्यावर त्यांचा भर आहे.
सध्या ३०० हून अधिक भारतीयांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. या नागरिकांना ताजिकिस्तान आणि कतार या देशांमार्गे एअरलिफ्ट केलं जात आहे. लवकरच एअर इंडियाचं विमान आपल्या ९० नागरिकांना घेऊन भारतात दाखल होईल. यापूर्वी भारतीय हवाई दलाचं विमान अफगाणिस्तानातील आपल्या राजदूतांसह इतर डिप्लोमॅट्स आणि १८० प्रवाशांना घेऊन भारतात दाखल झालं आहे.
दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षणविषयक मंत्रिमंडळाच्या समितीसोबत बैठक पार पडली होती. यामध्ये अफगाणिस्तानातून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.