India Canada Dispute justin trudeau repeat allegations on india over hardeep singh nijjar killing  Sakal
ग्लोबल

India Canada Dispute : शक्तिशाली देश असे वागले, तर जग सर्वांसाठी...; निज्जर हत्येप्रकरणी ट्रूडो पुन्हा बोलले

रोहित कणसे

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर च्या हत्येवरून पुन्हा एकदा भारतावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कॅनडाच्या भूमीवर त्यांच्या देशाचा नागरिक निज्जर याच्या हत्येच्या तपासात काय प्रगती झाली आणि प्रगती होत नसेल तर अमेरिकेने भारताबाबत कॅनडाच्या वतीने कठोर भूमिका घ्यावी का, असा प्रश्न एका पत्रकाराने ट्रुडो यांना विचारला. त्याला प्रत्युत्तर देताना जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर जे जुने आरोप केले होते, त्याच जुन्या आरोपांचा पुन्हा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान जस्टीन ट्रूडो म्हणाले की, कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत भारतीय सरकारी एजंट्सचा सहभाग असल्याबद्दल जेव्हा आम्हाला माहिती मिळाली, तेव्हा आम्ही भारताशी संपर्क साधला आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्हाला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय कायदा उल्लंघनानंतर आम्ही अमेरिका आणि आमच्या इतर मित्रराष्ट्रांशी संपर्क साधला. ही बाब आम्ही गांभीर्याने घेत आहोत.

आम्ही आमचे सर्व मित्र पक्ष आणि भागीदार देशांसोबत काम करत राहू, तपास यंत्रणा आपले काम करत राहतील. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण योग्य-अयोग्य हा निर्णय ताकतीच्या मदतीने ठरवले जाऊ लागले, जर मोठ्या देशांनी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले तर संपूर्ण जग सर्वांसाठी अधिक धोकादायक होईल.

कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना तेथील खासदार चंदन आर्य यांच्याकडून पार्लमेंट हिल येथे आयोजित कार्यक्रमात निमंत्रित केल्या बद्दल विचारले असता, ट्रुडो म्हणाले की, या गंभीर विषयावर आम्ही भारतासोबत रचनात्मक पणे काम करू इच्छितो, हे आम्ही स्पष्ट केले आहे. याच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि जगभरातील आमच्या भागीदारांशी संपर्क साधला आहे. म्हणूनच जेव्हा भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आणि ४० हून अधिक कॅनेडियन राजदूतांच्या सवलती मनमानीपणे रद्द केल्या तेव्हा आम्ही खूप निराश झालो.

जस्टिन ट्रुडो म्हणाले, 'आमच्या दृष्टिकोनातून विचार करा. कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत भारतीय सरकारी एजंटांचा सहभाग असू शकतो, असे मानण्याची गंभीर कारणे आपल्याकडे आहेत. आणि यावर भारताची प्रतिक्रिया होती व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करून कॅनडाच्या राजदूतांची हकालपट्टी करणे. जगभरातील देशांसाठी ही चिंतेची बाब आहे. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की आपले राजदूत दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंध अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते.

प्रत्येक पावलावर आम्ही भारतासोबत सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करत राहू. याचा अर्थ आम्ही भारत सरकारच्या राजकीय आधिकाऱ्यांसोबत काम करत राहू. जस्टीन ट्रुडो म्हणाले, आम्हाला या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. पण आम्ही नेहमीच कायद्याच्या पाठीशी उभे राहू. हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. भारत सरकारने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT