नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्राने मांडलेल्या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. इस्त्राइलने पॅलेस्टाईनमध्ये बेकायदा जमिनीवर मिळवलेला ताबा याविरोधात भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलम, सिरियन गोलन या भागामध्ये इस्राइलने बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मिळवला आहे. याविरोधात संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने कौल दिला.(India has voted in favour of a United Nations resolution that condemns Israeli settlements in Palestine.)
गुरुवारी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यानंतर दोन दिवसांनी हा ठराव स्वीकारण्यात आला आहे. अमेरिका आणि कॅनडासह सात देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. तर, १८ देशांनी तटस्थ राहण्याचा पर्याय निवडला. काही आठवड्यांपूर्वी इस्राइल-हमास युद्धाबाबत मांडलेल्या प्रस्तावावर भारताने भूमिका घेणे टाळले होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे
इस्राइल-हमास युद्धाबाबत भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत देशातून टीका झाली होती. हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने इस्राइलला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर युद्ध सुरु झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पॅलेस्टिनी प्रमुखांना संपर्क साधून सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले होते. तसेच मानवी दृष्टीकोणातून काही मदत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
इस्राइल आणि हमासमध्ये सुरु झालेल्या युद्धाने हिंसक वळण घेतले आहे. इस्त्राइलने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत १२०० लोकांची जीवितहानी झाली आहे. तर हमास पुरस्कृत सरकारने केलेल्या दाव्यानुसार, ११ हजारांपेक्षा अधिक पॅलेस्टिनी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यात मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे.
इस्राइल-हमास युद्धामध्ये भारताने समतोल भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने हमासच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय, तर दुसरीकडे इस्राइलने गाझामध्ये सुरु केलेल्या संहाराचा देखील निषेध केला आहे. इस्राइलने गाझातील नागरिकांना लक्ष्य करु नये असं भारताने म्हटलं आहे. दरम्यान, इस्राइलने गाझा पट्टीमध्ये नरसंहार सुरु केला आहे. गाझात भीषण युद्ध सुरु असून युद्ध विरामास इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी नकार दिला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.