husband bite his wife on her wrist gets divorce Sakal
ग्लोबल

Divorce Rate : जगात सर्वाधिक लग्न फक्त भारतातच टिकतात; आकडेवारी वाचलीत का?

सर्वाधिक म्हणजे ९४ टक्के घटस्फोट हे 'या' देशात होतात.

वैष्णवी कारंजकर

लग्नसंस्था आणि कुटुंब व्यवस्थेला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व दिलं जातं. घटस्फोटांसंदर्भात नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीमधून हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलं आहे. संपूर्ण जगात घटस्फोटांचं सर्वात कमी प्रमाण फक्त भारतात आहे.

भारतात घटस्फोटांचं प्रमाण जगाच्या तुलनेत केवळ १ टक्के आहे, अशी माहिती समोर आली आहे. काही देशांमध्ये हे प्रमाण ९४ टक्क्यांपर्यंत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सने दिलेल्या माहितीनुसार, आशिया देशांमध्ये लग्न मोडण्याचं प्रमाण कमी आहे. तर युरोप, अमेरिकेमध्ये हे प्रमाण जास्त आहे.

भारतानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो. व्हिएतनाममध्ये घटस्फोटांचं प्रमाण ७ टक्के आहे. याशिवाय ताजिकिस्तानमध्ये १० टक्के, ईराण १४ टक्के आणि मेक्सिकोमध्ये १७ टक्के घटस्फोट होतात. घटस्फोटांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, तुर्की आणि कोलंबियाचाही समावेश आहे.

जपानमध्ये घटस्फोटांचं प्रमाण ३५ टक्के असून जर्मनीमध्ये हे प्रमाण ३८ टक्के आहे. ब्रिटनमध्ये ४१ टक्के घटस्फोट होतात, तर चीनमध्ये घटस्फोटांचं प्रमाण ४१ टक्के आहे. अमेरिकेत हा आकडा ४५ टक्के असून डेन्मार्क, दक्षिण कोरिया, इटलीमध्ये ४७ टक्के घटस्फोट होतात.

तर घटस्फोटांचं सर्वाधिक प्रमाण पोर्तुगालमध्ये आहे. इथे ९४ टक्के घटस्फोट होतात. तर स्पेनमध्ये ८५ टक्के घटस्फोट होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

SCROLL FOR NEXT