India-Myanmar Border esakal
ग्लोबल

India-Myanmar Border : भारत- म्यानमारदरम्यानचा मुक्तसंचार थांबला, केंद्रीय गृहमंत्री शहांची मोठी घोषणा

भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानच्या सीमा भागातील मुक्त संचाराला केंद्र सरकारने आज कायमस्वरूपी ब्रेक लावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच तशी अधिकृत घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानच्या सीमा भागातील मुक्त संचाराला केंद्र सरकारने आज कायमस्वरूपी ब्रेक लावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच तशी अधिकृत घोषणा केली.

मणिपूरने या ताज्या घोषणेचे स्वागत केले आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरून केलेल्या घोषणेत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनीच देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा निर्धार केला असून हे त्यादृष्टाने टाकण्यात आलेले निर्णायक पाऊल असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी गृहमंत्री शहा यांनीच मंगळवारी साधारणपणे दीड हजार किलोमीटरची लांबी असणाऱ्या भारत- म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली होती.

इंफाळमधील मैतेई समुदायाने ही मागणी लावून धरली होती. या मार्गानेच काही दहशतवादी संघटना या भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप या समुदायाकडून करण्यात आला होता. या सीमेवर कसलेच कुंपण नसल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचेही या समुदायाने म्हटले होते. या मागणीबाबत शहांनी सकारात्मक पावले टाकण्याची घोषणा केली होती.

पंतप्रधान, गृहमंत्री यांचं आभार- मुख्यमंत्री

देशाच्या सीमा सुरक्षित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभारी आहोत. अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय समावेशकता जपण्यासाठी हे महत्त्वाचे ठरेल. बेकायदा स्थलांतराला यामुळे पायबंद होईल, अशी प्रतिक्रिया मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT