modi jinping main.jpg 
ग्लोबल

India or Bharat Row: "इंडिया की भारत? हा वाद कसला घालता, त्यापेक्षा..."; चीनचा भारताला सल्ला

देशात सध्या इंडिया की भारत? हा वाद सुरु आहे. हा वादा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात सध्या इंडिया की भारत? हा वाद सुरु आहे. हा वादा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. नुकतंच संयुक्त राष्ट्रांनी देखील भारताचं नाव बदलण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता चीननं भारताच्या या अंतर्गत विषयवार आपल्या मुखपत्रातून भाष्य केलं आहे. यातून पतंप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. (India or Bharat China Mouthpiece Global Times Offers G20 Advice To PM Modi)

ग्लोबल टाईम्स या चीन सरकारच्या मुखपत्रातून भारतात सुरु असलेल्या इंडिया की भारत? या वादावर भाष्य करण्यात आलं आहे. यात म्हटलं की, भारतानं G20 अध्यक्षपदाचा वापर आपल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी, आपलं उदारीकरणाचं धोरणाचा विस्तार करणं, याद्वारे परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करणं, अशा गुंतवणूकदारांना एक सुरक्षित व्यावसायिक वातावरण उपलब्ध करून देणं, या गोष्टी केल्या पाहिजेत. देशाचं नाव बदलायचं की नाही यापेक्षा हे सर्व महत्त्वाचं आहे" (Marathi Tajya Batmya)

दिल्लीत होत असलेल्या G20 समिटसाठी जे देश सहभागी आहेत त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'प्राईम मिनिस्टर ऑफ भारत' असा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख 'प्रेसिडंट ऑफ भारत' असा करण्यात आला आहे. तसेच सर्व भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी इंडिया नावाऐवजी भारत हे नाव वापरल्याचं समर्थन केलं आहे. तसेच याला विरोध करणाऱ्या विरोधकांवरच टीका केली आहे. (Latest Marathi News)

विशेष अधिवेशनात 'इंडिया' नाव काढणार?

त्यात भर म्हणजे, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सर्व सरकारी अधिकृत कार्यक्रमांसाठी इंडिया ऐवजी भारत नाव करण्याचा मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याची सुरुवात त्यांनी G20 समिटपासूनच केल्याचंही आता स्पष्ट झालं आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीची भाजपला धास्ती?

मोदी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी देशातील सर्व प्रमुख विरोधीपक्षांची इंडिया नावाची आघाडी झाली आहे. या आघाडीमुळं येत्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे अनेक सर्व्हे समोर आले आहेत.

यापार्श्वभूमीवर आघाडीच्या इंडिया या शब्दामुळं भांबावलेल्या भाजपनं भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट उल्लेख असलेला 'इंडिया दॅट इज भारत' हा उल्लेख वगळून केवळ भारत हाच उल्लेख करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT