मेलबर्न : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर असून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. सध्या ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांचे जंगी स्वागत ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आले आहे. हवेत welcome modi अशी अक्षरे लिहिले असून यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हवेत पांढऱ्या रंगाचे काही इंग्रजी रंगाचे अक्षर दिसत असून त्यावर वेलकम मोदी असं लिहिलं आहे. त्याचबरोबर याआधी मोदींच्या आगमनानंतर त्यांचे चरणस्पर्श केल्याचेही व्हिडिओ समोर आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेशी दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे.
2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर 2016 साली मोदींना 'अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार' या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
"श्रीमद्भगवद्गीतेतील सनातन विचारधारेच्या आधारावर भारत विश्वगुरू बनेल. फळाची अपेक्षा न करता काम केल्यास जीवनात यश मिळेल,'' असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. त्यानंतर भारताने विश्वगुरू बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पावले उचलत असल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.