Afghanistan Food Crisis  Team eSakal
ग्लोबल

अन्न संकट : पाकमार्गे अफगाणिस्तानात जाणार भारताचा गहू

यापूर्वी 3.6 टन वैद्यकीय मदत आणि कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

निनाद कुलकर्णी

अन्न संकटाचा (Food Crises In Afghanistan) सामना करणाऱ्या अफगाणिस्तानसाठी भारताने (India) पुढाकार घेतला आहे. अन्न संकटावर मात करण्यासाठी भारत पाकिस्तानमार्गे (Wheat Shipment) अफगाणिस्तानला गव्हाचा पुरवठा करणार आहे, हा पुरवठा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अफगाणिस्तानला गव्हाचा पुरवठा करण्यासंदर्भात अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती, अखेर दोन्ही देशांमध्ये अटींच्या आधारे करार झाला आहे. (India's wheat shipment to Afghanistan)

भारताने यापूर्वीच 50,000 टन गहू आणि औषधे (Medicine) पाकिस्तानमार्गे रस्ते वाहतुकीने अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानला पाठविण्यात येणाऱ्या गव्हाचा पुरवठा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू केला जाण्याची शक्यता आहे. अन्नधान्य, कोविड लस (Covid Vaccination) आणि जीवनरक्षक औषधे यासह अफगाण लोकांना मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही दिवसांत 3.6 टन वैद्यकीय मदत (Medical Help To Afghanistan) आणि 5,00,000 कोविड लसींचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

भाकरीसाठी किडनी, मुलांची विक्री

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) ताबा मिळवल्यानंतर देशातील वेगवेगळ्या अडचणींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता अन्न संकटाची (Afghanistan Food Crisis) तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात असल्यानं चिंता वाढली आहे. देशातील अर्ध्याहून अधिक लोक उपासमारीच्या समस्येला सामोरं जात आहेत. जिवंत राहण्यासाठी लोक आपली किडनी आणि मुलं विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून लोकांची अवस्था बिकट झाली आहे. एक वेळचं जेवण मिळवण्यासाठी लोक शरीराच्या अवयवांचा व्यापार करत असल्याचं समोर आलं आहे.

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानला असलेली आंतरराष्ट्रीय मदत थांबवण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीत लाखो लोकांचे जीव अन्नावाचून धोक्यात आले आहे. हेरात शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहार-ए-सेबज भागात हजारो अफगाणी, विशेषत: बहुतेक पश्तून लोक अत्यंत बिकट परिस्थितीत उदर्निवाह करत आहेत. तालिबान आणि मागच्या सरकारमधील संघर्षामुळे आणि गेल्या 4 वर्षांच्या दुष्काळामुळे अनेकांना आपली घरं सोडावी लागली आहेत.

तुर्की वृत्तवाहिनी टीआरटी वर्ल्डच्या वृत्तानुसार काही लोक दिवसभर फक्त चहा पितात, फक्त भाकरी खातात. अनेकांकडे उपचारासाठीही पैसे नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. अब्दुलकादिर म्हणतात, 'मी माझी एक किडनी दीड लाख अफगाणी रुपयांना ( भारतातील 1 लाख 9 हजार रुपये) विकण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला सांगितलं की, जर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि माझी किडनी काढली गेली तर मी माझा मृत्यू होईल. तरीही मला माझी किडनी विकायची आहे. कारण आमची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की, मी माझं एक मूल 150,000 अफगाणी रुपयांना विकायला तयार आहे. कारण मला माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना वाचवायचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT