Indian Americans 
ग्लोबल

83 टक्के अमेरिकन भारतीय हिंदू स्वत:ला सांगतात उच्च जातीचे- सर्व्हे

कार्तिक पुजारी

10 पैकी 8 भारतीय जे हिंदू आहेत स्वत:ला उच्च जातीचा असल्याचं म्हणून सांगतात, असं एका सर्व्हत सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली- 10 पैकी 8 भारतीय जे हिंदू आहेत स्वत:ला उच्च जातीचा असल्याचं म्हणून सांगतात, असं एका सर्व्हत सांगण्यात आलं आहे. द इंडियन अमेरिकन अॅटिट्यूट सर्व्हे The Indian American Attitudes Survey (IAAS) ने यासंबंधी सर्व्हे केला होता. IAAS ने सर्व्हेसाठी कार्नेगी एंडॉवमेंट इंटरनॅशनल पीस Carnegie Endowment for International Peace, जॉन्स हॉपकिन्स-एसएआयएस Johns Hopkins-SAIS आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सेल्वेनिया University of Pennsylvania यांचा सहयोग घेतला होता. (Hindu Indian Americans who identify with caste say they are upper caste)

IAAS ने 1,200 भारतीय-अमेरिकन लोकांचा या सर्व्हमध्ये समावेश करुन घेतला होता. यातील 83 टक्के नागरिकांनी स्वत:ला उच्च जातीचा असल्याचं सांगितलं. 16 टक्के लोकांनी ओबीसीमध्ये येत असल्याचं सांगितलं, तर 1 टक्के लोकांनी एससी किंवा एसटीमध्ये असल्याची ओळख सांगितली. परदेशात जन्म झालेले आणि अमेरिकेमध्ये जन्म झालेल्या भारतीय-अमेरिकन लोकांच्या उत्तरामध्ये भिन्नता आढळली.

परदेशात जन्म झालेल्या जवळपास 53 टक्के भारतीय-अमेरिकी नागरिकांनी जातीशी जवळीक दाखवली, तर 32 टक्के अमेरिकेत जन्मलेले जातीशी संलग्न आहेत. सर्व्हेमध्ये समावेश करुन घेण्यात आलेले 77 टक्के लोक भारतीय-अमेरिकी नागरिक होते, तर उर्वरित भारतीय-अमेरिकन नागरिक नव्हते. 1 ते 20 सप्टेंबरदरम्यान YouGovच्या मदचीने हा सर्व्हे घेण्यात आला होता. दोन पैकी एक भारतीय-अमेरिकी नागरिकाला भेदभाव सहन कराला लागला आहे. मुख्यत्वे शरीराच्या रंगावरुन हा भेदभाव केला जातोय. विशेष म्हणजे परदेशात जन्म झालेल्यांपेक्षा ज्यांचा जन्म अमेरिकेत झालाय त्यांनी असा भेदभाव जास्त झाल्याचं म्हटलंय.

आफ्रिकन किंवा आशियाई लोकांच्या तुलनेत भारतीयांना कमी भेदभाव सहन करावा लागतो, असंही सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलंय. भारतीय वंशाच्या लोकांविरोधातील भेदभाव गंभीर गोष्ट आहे का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. त्यातील 53 टक्के लोकांना ही शुल्लक समस्या वाटते, तर 31 टक्के लोकांना हा गंभीर मुद्दा वाटतो. 17 टक्के लोकांना यात कसलीही समस्या नाही.

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 88 हिंदूंनी भारतीय असणं महत्त्वाचं वाटतं, असं म्हटलं. हेच प्रमाण भारतीय मुस्लिमांमध्ये 79 टक्के आणि ख्रिश्चनांमध्ये 66 टक्के आहे. भारतीय मुस्लिमांपेक्षा भारतीय हिंदूमध्ये मोदी लोकप्रिय आहेत. काँग्रेस समर्थक असणाऱ्या 30 टक्के भारतीयांनी भाजप समर्थक मित्र असल्याचं त्रासदायक असल्याचं म्हटलं, तर 66 टक्के भाजप समर्थकांनी काँग्रेस समर्थक मित्र असणे त्रासदायक असल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT