नायजेरिया देशात अडकलेल्या भारतीय खलाशांची सुटका करण्यात सरकारला यश मिळालं आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर हे भारतीय मायदेशी परतले आहेत. नायजेरियामध्ये तेलाची चोरी केल्याचा ठपका ठेवत या १६ खलाशांना ताब्यात घेण्यात आले होते.
या खलाशांची चौकशी करुन, कोर्टात सुनावण्या पार पडल्या. अखेर दोन्ही बाजूंनी सेटलमेंट झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. केरळच्या कोची विमानतळावर या खलाशांचं आगमन झालं. याठिकाणी त्यांची फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आलं. एएनआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
MT हीरोईक इडन या जहाजावरील हे खलाशी होते. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ते नायजेरियामध्ये अडकले होते. या सर्वांना नायजेरियन सरकारने या सर्वांना यापुढे खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. मायदेशी परतल्यानंतर या सर्वांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
भारत सरकारचे अथक प्रयत्न
या सर्व प्रकरणात भारत सरकारने आमची साथ आजिबात सोडली नाही. आम्ही परत येण्याची आशा सोडली होती. मात्र, भारत सरकारचे अधिकारी वेळोवेळी आम्हाला धीर देत होते. भारताचा पासपोर्ट आमच्याजवळ असल्यामुळे आमचा भरपूर फायदा झाला. या पासपोर्टचं मूल्य आम्हाला समजलं. अशा शब्दांमध्ये या खलाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी परराष्ट्र मंत्रालय आणि भारताचे नायजेरियातील हाय कमिश्नर जी. बालासुब्रमण्यन यांचे या खलाशांनी मनापासून आभार मानले.
या जहाजावर एकूण २६ खलाशी होते. यांपैकी १६ भारतीय खलाशांना आधी इक्वेटोरियल गिनी या देशात ताब्यात घेण्यात आलं होतं. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्यांना याठिकाणी ताब्यात घेतलं गेलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांना नायजेरियाला हलवण्यात आलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.