jeffrey archer amish tripathi sakal
ग्लोबल

Indian Story : भारतीय कथांचा होणार सन्मान; आर्चर-त्रिपाठी यांच्याकडून नव्या पुरस्काराची घोषणा

पीटीआय

लंडन - समकालीन भारतीय काल्पनिक कथांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय कथांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कथांचा गौरव करण्यासाठी नव्या साहित्य पुरस्काराची घोषणा झाली आहे. या पुरस्कारासाठी जेफ्री आर्चर आणि अमिश त्रिपाठी हे दोन ‘बेस्टसेलर’ लेखक आणि इंडियन ग्लोबल फोरम हे एकत्र आले आहेत. ‘आयजीएफ आर्चर-अमिश’ असे या पुरस्काराचे नाव असून २५ हजार डॉलर इतकी पुरस्काराची रक्कम असेल.

इतर जग भारताकडे ज्या दृष्टीने पाहते आणि भारतीय लोक स्वत:कडे जसे पाहतात, यामध्ये प्रचंड फरक असल्याचे अमिश त्रिपाठी यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय कथांना आणि उत्कृष्ट कथाकथन कौशल्य असलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले. अमिश त्रिपाठी हे हिंदू पुराणकथांच्या संकल्पनेवर आधारित पुस्तके लिहितात.

‘कथा उत्कृष्टपणे सांगण्याच्या कौशल्याला दाद देण्यासाठी हा पुरस्कार आहे. पुरस्कार देतानाही हा निकष महत्त्वाचा असेल. त्यामुळेच वाचताना कदाचित कंटाळवाणे वाटणाऱ्या, पण चांगली भाषा वापरलेल्या कथांनाही पुरस्कार मिळू शकतो,’ असे त्रिपाठी यांनी सांगितले.

जेफ्री आर्चर हे अत्यंत जगप्रसिद्ध ब्रिटिश लेखक आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचा हिंदी, मराठी व विविध जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना आर्चर म्हणाले, ‘पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण ते मान्यता मिळवून देतात.

काही तरी साध्य करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्यांना, ते एकटे नाहीत याची जाणीव करून देण्यासाठी पुरस्कार महत्त्वाचे असतात. लेखन हे एकट्याने करायचे असते. ते करत असताना तुम्ही जगापासून लांब राहता. त्यामुळे जग ज्यावेळी पुरस्काराच्या रुपाने तुम्हाला मान्यता देते, त्यावेळी ती तुमच्या बुद्धिमत्तेला दिलेली दाद असते.’

वर्षाअखेरीस नामांकने

पुरस्कारासाठी या वर्षीच्या अखेरीस नामांकने स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. यासाठीचे निकष आणि परीक्षक यांचीही माहिती त्याचवेळी जाहीर केली जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांची घोषणा पुढील वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या आयजीएफ परिषदेत होणार असल्याचे ‘आयजीएफ’तर्फे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT