India's Stand On Iran Israel War Esakal
ग्लोबल

Iran Strike On Israel: इस्त्रायल-इराण वादात भारताची काय भूमिका? घेतला महत्त्वाचा निर्णय

Israel Iran Row: दरम्यान, या देशांमधील भारतीय वकीलातीचे अधिकारी तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

आशुतोष मसगौंडे

Iran Israel War:

आधीच तणावग्रस्त असलेल्या पश्चिम आशियामध्ये इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वातावरण तापले आहे. या मुळे संभाव्य युद्धजन्य स्थिती लक्षात घेऊन भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोका होईल असा मार्ग टाळण्याचे आणि राजनैतिक संवादाचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

इराणच्या दमास्कसमधील वाणिज्य दूतावासावर इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने काल हा हल्ला केला. या हल्ल्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने प्रतिक्रिया देत, परिस्थिती चिघळेल अशी कृती टाळण्याचे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या देशांमधील भारतीय वकीलातीचे अधिकारी तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने या संघर्षावर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढल्याने चिंता वाटते आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, हिंसाचार टाळून मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत यावे. पश्चिम आशियातील बदलणाऱ्या परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, इराणच्या सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजात १७ भारतीय क्रू मेंबर आहेत. या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत इराणच्या संपर्कात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT