वॉशिंग्टन : अमेरिका आणि ब्रिटनसहित जगभरातील 15 देशांमध्ये भारतीय वंशाचे 200 हून अधिक लोक आघाडीच्या नेतृत्वपदावर कार्यरत आहेत. इतकंच नाही तर यातील 60 लोकांनी विविध देशांच्या मंत्रीमंडळात देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे. '2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स'च्या पहिल्या यादीत याबाबतची माहिती दिली गेली आहे. सरकारी वेबसाईट्स आणि सार्वजनिक रित्या उपलब्ध असणाऱ्या इतर माहितीच्या आधारावर ही यादी तयार केली गेली आहे.
15 देशांमध्ये भारतीय व्यक्ती उच्चपदस्थ
या यादीमध्ये सांगितलं गेलंय की भारतीय वंशाचे 200 हून अधिक नेते जगभरातील 15 देशांमध्ये लोकसेवेच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. यातील 60 हून अधिक लोक मंत्रीमंडळामध्ये पदभार सांभाळत आहेत. 'इंडियास्पोरा'चे संस्थापक, उद्योगपती आणि गुंतवणूकदार एम. आर. रंगास्वामी यांनी म्हटलंय की ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वांत जुन्या लोकशाही देशाची पहिली महिला उपराष्ट्राध्यक्षा ही भारतीय वंशाची आहे.
अमेरिकेचे खासदार असणाऱ्या अमी बेरा यांनी म्हटलं की, '2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स' च्या यादीत सामील होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहेय संसदेत मोठ्या काळापासून मी सेवा देत आहे. मला भारतीय-अमेरिकन समुदायाची नेता म्हणून गर्व वाटतो. हा भारतीय समुदाय आता अमेरिकन समाजाचा एक अभिन्न असा अंग बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.