भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची चित्ररथ प्रकरण चांगलंच पेटलं आहे. भारताकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना कॅनडामध्ये भारताच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येचा चित्ररथ काढण्याचा मुद्दा कायदेशीररित्या द्वेषासंबंधीत गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही असे ब्रॅम्प्टन सिटीचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे.
4 जून रोजी काढण्यात आला होता चित्ररथ
ऑपरेशन ब्लू स्टारच्या 39 व्या वर्धापन दिनापूर्वी 4 जून रोजी झालेल्या परेड दरम्यान हा वादग्रस्त चित्ररथ काढण्यात आला होता. खलिस्तान समर्थकांच्या या चित्ररथामध्ये दोन शीख बंदूकधारी माजी पंतप्रधानांवर गोळीबार करताना दिसत होते. यासोबत पोस्टर्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये हा बदला आहे असे लिहिले होते. इतर फलकांवर 1984 च्या शीख विरोधी दंगलीचा संदर्भ देणारे बॅनर होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जयशंकर यांनी इशारा दिला
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी गुरुवारी याप्रकारणी कठोर शब्दात कॅनडाला सुनावले होते, हे परस्पर संबंध आणि कॅनडासाठी चांगले नसल्याचे जयशंकर म्हणाले होते. या घटनेनंतर लगेचच भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांनी ट्विट करून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. द्वेष किंवा हिंसाचाराला कॅनडामध्ये स्थान नाही, असेही ते म्हणाले होते.
कॅनडाधील मेयरच्या विधानामुळे खळबळ
या प्रकरणावर भाष्य करताना मेअर पॅट्रिक ब्राऊन म्हणाले की कॅनेडाच्या कायद्यानुसार टोरंटो एरियामधील परेड दरम्यानचे ते दृश्य कायद्यानुसार द्वेषासंबंधीत गुन्हा मानले जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत किंवा तो सिटी ऑफ ब्रॅम्प्टनचा कार्यक्रमही नव्हता.
त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाचा कायदा कॅनेडियनांना विचार, विश्वास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतो. याशी संबंधित कायद्यात बदल करण्याचा कोणताही निर्णय फेडरल स्तरावर घेतला जातो. पोलिस कायद्यांची अमंलबजावणी करता, बनवत नाहीत.
हे मान्य नाही
याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना एका वरिष्ट भारतीय अधिकाऱ्याने ही घटना स्वीकार्य नसल्याचे म्हटले आहे. तुम्ही अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू शकत नाही. एका लोकशाही असलेल्या देशाच्या नेत्याच्या हत्येचे महिमानंडन करत आहात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.