Interesting Facts esakal
ग्लोबल

Interesting Facts : ब्लेडच्या मधली डिझाईन समईचं चित्र काढण्यासाठी नाही तर, या कारणासाठी असते...

ब्लेड आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितच नाहीत.

धनश्री भावसार-बगाडे

Purpose Of Design Between Shaving Blade : आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रोज वापरतो पण त्याचा नेमका उपयोग, कारणच आपल्याला माहित नसतं. जसं ब्लेडच्या आत असणारी डिझाइनचा वापर आजवर मुलांना समई काढण्याची डिझाइन शिकवण्यासाठीच बहुतेक वेळा झाला आहे.

ब्लेड आपल्याला रोजच्या कामात फार उपयोगी ठरते. विशेषतः पुरुषांना शेविंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. ब्लेडच्या आतली जागा मोकळी का सोडलेली असते जाणून घेऊया.

Interesting Facts

ब्लेडची कहाणी

ब्लेड बनवण्यामागे फारच रोमांचक कहाणी आहे. ब्लेड सगळ्यात पहिले जिलेट कंपनीचे प्रमुख संस्थापक किंग कँप जिलेटने विल्यम निकर्सनच्या मदतीने १९०१ मध्ये बनवलं होतं. त्याचवर्षी त्यांनी आपल्या नव्या ब्लेडच्या नव्या डिझाइनचं पेटंट केलं. १९०४ मध्ये औद्योगिक स्तरावर ब्लेडची निर्मिती सुरू केली. १९०४ मध्ये त्यांनी १६५ ब्लेड बनवले. त्यावेळी ब्लेड शेविंगसाठी वापरले जात. त्यावेळी ब्लेडच्या मधली जागा शेविंग रेझरच्या मध्ये बसवता यावे.

Interesting Facts

इतर कंपनींने केले कॉपी

जिलेटच्या ब्लेडचे हेच डिझाइन पुढे जाऊन इतर कंपन्यांनीही कॉपी केलं. यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे. काही काळाने इतर कंपनींनेपण ब्लेड बनवणं सुरू केलं. पण त्यावेळी शेविंग ब्लेड फक्त जिलेट कंपनीच बनवत होती. कारण जिलेट शिवाय इतर कोणतीच कंपनी रेझर बनवत नव्हती. त्यामुळे इतर कंपन्यांना पण जिलेटचेच डिझाईन नाईलाजाने फॉलो करावे लागले कारण त्यांचे ब्लेड जिलेटच्या रेझरमध्ये बसावे. आज जगभरात साधारण १ मिलीयनच्या आसपास ब्लेड बनवले जातात, ते सगळेच याच डिझाइनचे असतात.

हा होता ब्लेडच्या मध्ये बनवलेल्या डिझाइनच्या मागचं कारण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT