International Mens Day sakal
ग्लोबल

International Mens Day 2023 : आज साजरा केला जातोय 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन'; काय आहे या दिनाचं महत्त्व?

दरवर्षी का साजरा केला जातो ‘International Men’s Day’? जाणून घ्या या खास दिवसाचे महत्त्व

Aishwarya Musale

19 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

'महिला दिना'प्रमाणेच, 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. हाच दिवस आहे जेव्हा समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. 

हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि समाजातील पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिनामुळे लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास

1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व

आंतरराष्‍ट्रीय पुरूष दिन साजरा करण्‍याचा मुख्‍य उद्देश हा आहे की, पुरूषांचे संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT