भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो, जेव्हा तो उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. सर्वात आधी 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या 177 सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
तेव्हापासून दरवर्षी योग दिवस साजरा केला जातो. असे अनेक देश आहेत जे अजूनही योगाकडे धर्माच्या दृष्टीकोनातून पाहतात. यातील बहुतांश इस्लामिक देश आहेत. मात्र, इजिप्त, सौदी अरेबियासारख्या देशांनी योगाला मान्यता दिली आहे.
तेथे त्याचे आयोजन केले जाते. पण काही इस्लामिक देशांनी योग नाकारला आहे. त्या देशात योग करण्याला बंदी आहे. असे कोणते देश आहेत जिथे योग केला जातो अन् कुठे बंदी आहे हे पाहुयात.
सौदी अरेबियाने 2017 मध्ये योगाला एक खेळ म्हणून मान्यता दिली आहे. मालदीव, मलेशिया, पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांमध्ये योग हा धर्माशी जोडला गेला. त्यामुळे त्या देशांमध्ये योगाला मान्यता नाही.
सौदी अरेबियाने 2017 मध्ये योगाला अधिकृतपणे खेळ म्हणून मान्यता दिली होती. या निर्णयानंतर 2021 मध्ये सौदी योग समितीची स्थापना करण्यात आली. सौदी योगा फेडरेशन म्हणून स्थापन झाले. याशिवाय मक्का आणि मदिना येथेही सौदी अरेबियाने योगा चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलींची संख्या अधिक होती.
आता रियाधपासून मक्कापर्यंत सर्व पवित्र ठिकाणी योगाचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर सौदी अरेबियामध्ये योगशिक्षणाच्या माध्यमातून लोकांमध्ये योगाचा सातत्याने प्रचार केला जातो.
योगासाठी लागेल लायसन्स
आता सौदी अरेबियात कोणाला योग शिकवायचा असेल किंवा शिकायचा असेल तर त्यासाठी खास लायसन्स काढावे लागते. कोणीही व्यक्ती परवाना घेऊन योग करू शकते. सौदी अरेबियातील नूफ मारवाई या योग लायसन मिळवणाऱ्या तिथल्या पहिल्या योग शिक्षिका आहेत.
नूफ मारवाई भारताला आपले दुसरे घर मानतात. आणि सौदी अरेबियामध्ये योगाला तिने एक चळवळ बनवली आहे. या चळवळीसाठी तिने अरब योग फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ती योगाचे कार्यक्रम करते.
तर, कुवेत हा आणखी एक अरब देश आहे, ज्याचे भारताशी चांगले संबंध आहेत. असे असूनही, इस्लामिक धर्माच्या मौलानांच्या दबावामुळे २०२२ मध्ये तेथे योग कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. कुवेतमधील एका योग शिक्षकाने वाळवंटी भागात वेलनेस योग रिट्रीट आयोजित केले होते. याची जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर या कार्यक्रमाला विरोध झाला. हा वाद वाढत गेल्याने कुवेत सरकारने या कार्यक्रमावर बंदी घातली.
कुवेतमधील महिला सरकारच्या या निर्णयाविरोधात उभ्या राहिल्या, मात्र कुवेतमध्ये उघड्यावर योगा करण्यावर बंदी आहे. इतकेच नाही तर सौदी अरेबियाने आपल्या विद्यापीठांमध्ये योग सुरू करण्याची घोषणा केली होतीय.
ज्यावर अरब देशांनी जोरदार विरोध दर्शवला होता. म्हणजेच सौदी अरेबिया वगळता बहुतेक अरब देश अजूनही आपली कट्टरता कायम ठेवतात आणि सार्वजनिक योगासने विरोधात आहेत.
या देशात योग नाहीच!
मालदीव, पाकिस्तान आणि मलेशिया सारख्या कट्टर इस्लामिक देशात योग करण्यास बंदी आहे. अनेक इस्लामिक देशांमध्ये, मौलाना संघटना योग म्हणजे देवाची पूजा असल्याचे मानून विरोध करतात. योगामध्ये सुर्याला नमस्कार केला जातो. म्हणजे एक प्रकारे सूर्याची पूजा केली जाते, त्यामुळे योग त्यांच्या परंपरेला धरून नाही, असे मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.