क्रिप्टोकरन्सीचा बाजार सध्या वेगवेगळ्या गोष्टींशी सामना करित आहे. क्रिप्टोत रस असणाऱ्यांना डोजकाॅईनविषयी माहिती असेल. एक गंमत म्हणून सुरु झालेल्या या करन्सीचे मूल्य वेगाने वाढले आणि घटले आहे. विशेषतः टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलाॅन मस्क (Elon Musk) यांनी प्रोमोट केल्यानंतर त्याचे मूल्य वाढले होते. एका डोजकाॅईनच्या गुंतवणुकादाराने मस्क आणि त्यांच्या कंपनीवर २५८ अब्ज डाॅलरची (जवळपास २०,१३६ अब्ज रुपये) नुकसान भरपाईचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. केथ जाॅन्सन नावाच्या व्यक्तीने टेस्ला आणि स्पेसएक्ससह मस्कवर गुरुवारी केस दाखल केली आहे. (Investor Sues Tesla CEO Elon Musk For Supporting Cryptocurrency)
जाॅन्सन म्हणाले, की त्यांनी डोजकाॅईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे गमावले आहे. केथ जाॅन्सन यांनी स्वतःला अमेरिकन नागरिक म्हटले असून स्वतःची फसवणूक झाली असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार क्रिप्टोकरन्सीमध्ये (Crypto Currency) गुंतवणुकीच्या नावावर त्यांच्याबरोबर डिजकाॅईन क्रिप्टो पिरामिड योजनेत फसवणूक झाली आहे.
क्रिप्टोत गुंतवणूक ठरली तोट्याची
वास्तविक डोजकाॅईन क्रिप्टोकरन्सीत आपली गुंतवणूक आणि तो पैसा बुडवण्यास गुंतवणूकदारांनी फसवणूक म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी मस्कविरोधात न्यूयाॅर्क न्यायालयात दावा दाखल केला आहे. जाॅन्सनच्या म्हणण्यानुसार ते वर्ष २०१९ पासून डोजकाॅईनमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारानुसार मस्क यांनी प्रोमोट केल्यानंतर त्यांना ८६ अब्ज डाॅलरचे नुकसान झाले आहे. त्यांना मस्क यांच्याकडून ते पैसे परत हवे आहेत. फक्त हे पैसेच नाही जाॅन्सन आपल्या नुकसानीच्या दुप्पट रक्कम वेगळी मागत आहे. ती १७२ अब्ज डाॅलर इतकी अतिरिक्त रक्कम आहे. म्हणजे एकूण २५८ अब्ज डाॅलर रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.