Iran Israel War Esakal
ग्लोबल

Iran Israel War: मोठी बातमी! इराणचा इस्राइलवर ड्रोन अटॅक; डझनभर ड्रोन केले लॉन्च, लेबनानचे एअरस्पेस बंद

Iran Israel War: इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणने आपल्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन डागल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण दल हाय अलर्टवर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

इराण आणि इस्राइलमधील वाढता तणाव अनपेक्षित दिशेने वळला आहे. इराणने इस्राइलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणने शनिवारी (ता १३) इस्रायलच्या दिशेने डझनभर ड्रोन लॉन्च केले आहेत. मात्र, हे ड्रोन इस्राइलला पोहचण्यासाठी काही तास लागतील, असं इस्राइलच्या सैन्याने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर इराणने आपल्या दिशेने १०० हून अधिक ड्रोन डागल्याचा दावाही इस्रायली लष्कराने केला आहे.

इराणने आपल्या हद्दीतून इस्राइलवर ड्रोन डागल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्राइलचे संरक्षण दल हाय अलर्टवर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने आणि इस्रायली नौदलाच्या जहाजांसह, IDF ने हवाई संरक्षण श्रेणीलाही हाय अलर्टवर ठेवले आहे. इस्राइलचे हवाई आणि नौदल या भागावर लक्ष ठेवून आहेत.दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीवमध्ये मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

इराण आणि इस्राइल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पथकाची भेट घेत आहेत. दुसरीकडे, इराणच्या या ड्रोन हल्ल्यानंतर, इराणचे नेते खामेनी यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये खामेनी म्हणाले की, दुष्ट शासनाला शिक्षा होईल.

इराणच्या हल्ल्यावर इस्राइलने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी म्हटले की इराणने इस्राइलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे लष्करी तळाचे किरकोळ नुकसान झाले. ते म्हणतात की बहुतेक क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याच्या एरो एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रोखली गेली. बहुतेक क्षेपणास्त्रे इस्राइलच्या हवाई हद्दीबाहेर टाकण्यात आली.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी या शत्रुत्वाचा तात्काळ अंत करण्याची मागणी करतो. या प्रदेशाला किंवा जगाला दुसरे युद्ध परवडणारे नाही.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत आणि विशेषत: गेल्या काही आठवड्यांपासून इस्राइल इराणकडून थेट हल्ल्याची तयारी करत आहे. आमच्या संरक्षण यंत्रणा तैनात आहेत. बचाव आणि आक्रमण या दोन्ही बाबतीत आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत. इस्राइल मजबूत आहे. IDF मजबूत आहे. जनता बलवान आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यांच्या माहितीसाठी मी नुकताच माझ्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला भेटलो. इराण आणि त्याच्या प्रॉक्सीकडून येणा-या धोक्यांपासून इस्राइलच्या सुरक्षेसाठी आमची वचनबद्धता कायम आहे.

आयडीएफने पुष्टी केली की, इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच सध्या इस्त्रायली हवाई दलाची अनेक विमाने स्टँडबायवर आहेत, आम्ही कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास तयार आहोत. इस्राइल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणच्या हल्ल्याला इस्राइलचे उत्तर स्पष्ट आणि निर्णायक असेल.

इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलच्या डिफेन्स फोर्सने हायअॅलर्ट जारी केला आहे. खबरदारी म्हणून एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. आम्ही इराणचे विमान किंवा ड्रोन पाडण्यासाठी सज्ज आहोत, असं इस्रायलने म्हटलं आहे.

यापार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच डिफेन्स फोर्स सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहे. इराणच्या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली एअरफोर्सने फायटर जेट आणि नौदलाच्या जहाजांसोबतच एरिअल डिफेन्स एरेलाही हायअलर्टवर ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

Nagpur Accident News: अतिशय गंभीर...52 विद्यार्थी प्रवास करत असलेली ट्रॅव्हल्स पलटी, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT