Fire Accident Esakal
ग्लोबल

Fire Accident: लग्न समारंभात लागलेल्या आगीत १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू; तर नववधू, वरासह १५० जण जखमी

आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

इराकच्या निनवेह प्रांतात एका लग्न समारंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. उत्तर इराकमधील लग्नाच्या हॉलमध्ये लागलेल्या आगीत किमान 100 लोक ठार झाले असून 150 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना इराकच्या निनवेह प्रांतातील हमदानिया भागात लागली आहे. हे राजधानी बगदादच्या वायव्येस सुमारे 335 किलोमीटर (205 मैल) उत्तरेकडील मोसुल शहराच्या अगदी बाहेर आहे.(Latest Marathi News)

आग कशामुळे लागली याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. CCTV फुटेजमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये जळालेला मलबा दिसत होता. आरोग्य अधिकार्‍यांनी सरकारी इराकी वृत्तसंस्थेद्वारे मृतांच्या संख्येबाबत माहिती दिली आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक अहवालात समोर येत आहे.(Latest Marathi News)

मृतांचा आकडा वाढू शकतो

अधिकाऱ्यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र यांनी सरकारी इराकी वृत्तसंस्थेद्वारे मृतांच्या संख्येची माहिती दिली आहे. अल-बद्र म्हणाले की, दुर्दैवी अपघातामुळे प्रभावित झालेल्यांना मदत दिली जाईल. पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आणि देशाच्या अंतर्गत आणि आरोग्य अधिकाऱ्यांना मदत देण्यास सांगितले आहे, असे त्यांच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.

आगीचे कारण कळू शकलेले नाही

निनवेचे प्रांतीय गव्हर्नर नजीम अल-जुबरी म्हणाले की, काही जखमींना प्रादेशिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आगीत झालेल्या जीवितहानींची अद्याप कोणतीही अंतिम आकडेवारी नसून मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. आगीच्या कारणाबाबत कोणतेही तात्काळ अधिकृत माहिती नाही, परंतु कुर्दिश दूरचित्रवाणी वृत्तवाहिनी रुडावच्या प्राथमिक अहवालानुसार आग घटनास्थळी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली असावी.(Latest Marathi News)

इराकी वृत्तसंस्थेने नागरी संरक्षण अधिकार्‍यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, लग्नमंडपाचा बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणाने सजवण्यात आला होता, जो देशात बेकायदेशीर होता. सिव्हिल डिफेन्सने सांगितले की, आग अत्यंत ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे लागली, ज्यामुळे हॉलचे काही भाग कोसळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT