इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ISISच्या दोन अतिरेक्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलंय. यामध्ये दोन्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जबर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला त्यावेळीच झाला आहे, जेंव्हा अरबच्या चार परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दक्षिण इस्रायलमध्ये एकत्र येत आहेत.
रविवारी रात्री झाला हल्ला
संरक्षण मंत्री ओमर बारलेव यांनी म्हटलंय की, रविवारी रात्री हदेरा शहरामध्ये झालेल्या एका घातक दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन इस्रायली मारले गेले आहेत तसेच इतर अनेक जण जखमी झाले आहेत. बरलेव यांनी काल रविवारी अर्ध्या रात्री आर्मी रेडीयोशी बातचित करताना म्हटलंय की, हा एक खूपच गंभीर हल्ला आहे. आम्ही इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवाद्यांचा शोध घेत आहोत.
बारलेव यांनी हल्लेखोरांच्य ISIS कनेक्शनविषयी सविस्तर माहिती दिली नाहीये तसेच त्यांची नावे आणि ओळखही स्पष्ट केली नाहीये. मात्र, त्यानंतर ISIS ने एका साईटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत असल्याची घोषणा केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.