नवी दिल्ली : बेंजामिन नेत्यान्याहू यांच इस्रायलच्या पंतप्रधानपदी कमबॅक झालं आहे. इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान यायर लॅपिड यांचा पराभव झाल्यानं नेत्यानाहू यांची पुन्हा पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. एनबीसी न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेत्यानाहू हे चांगले मित्र आहेत. (Israel Benjamin Netanyahu makes comeback as PM Yair Lapid concedes defeat, reports NBC News)
इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंजामिन नेत्यानाहू यांचा विजय झाला आहे. यामध्ये विद्यमान पंतप्रधान याइर लापिड (Yair Lapid) यांना पराभवाचा सामना करावा लागला. इस्रायलच्या निवडणुकीत सुमारे ९१ टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली. यामध्ये १२० जागांपैकी ६५ जागांवर नेत्यानाहू यांच्या गटानं विजय मिळवला.
दरम्यान, नेत्यानाहू यांच्या लिकुड पक्षाला ३२ जागा, पंतप्रधान याईर लापिड यांच्या येश आतिद पक्षाला २४, रिलिडिय जियोनिज्म पक्षाला १४ तर नॅशनल युनिटी पक्षाला १२, शास पक्षाला ११ आणि युनायटेड टोरा जुदाइस्म पक्षाला आठ जागा मिळाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.