Israel Gaza Attack sakal
ग्लोबल

Israel Gaza Attack: रुग्णालयावरील हल्ला हा गुन्हाच; इस्राइल विरुद्ध इस्लामी देश एकवटले!

Israel Gaza Attack:

Chinmay Jagtap

Israel Vs Gaza: गाझा शहरातील अल अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) आपत्कालीन बैठक बोलाविली होती. हमास आणि इस्राईलच्या युद्धात गाझा शहरातील अल अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर ५०० जणांचा बळी गेला आहे. हा हल्ला युद्ध गुन्हा असल्याचे इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) बुधवारी जाहीर केले.

त्यावेळी हा हल्ला युद्ध गुन्हाच्या श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इस्राईलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर सतत अत्याचार करीत आहे. रुग्णालयावरील हल्ल्यातून इस्राईल कोणत्या थराला गेला आहे, हे समजते, असे या बैठकीत सहभागी झालेल्या देशांनी म्हटले आहे. तसेच रुग्णालयावर बाँबहल्ला केला नसल्याचा इस्राईलचा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले.

इस्राईलला साथ देणाऱ्या देशांवरही इस्लामिक सहकार्य संघटनेने टीका केली आहे. या संघटने ५७ मुस्लिम देश सदस्य आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांविरोधातील क्रूरतेचे समर्थन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाची निषेध करीत 'ओआयसी'ने म्हटले आहे, की जगातील अनेक देश इस्राईलबाबत दुटप्पी भूमिका घेत असून त्याला माफ करीत एक प्रकारे बचाव करीत आहेत.

पॅलेस्टिनी नागरिकांवरील भयंकर युद्ध गुन्ह्यांसाठी इस्राईलला जबाबदार ठरविण्याचे आवाहन या मुस्लिम संघटनेने आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. तसेच युद्ध रोखण्यात अपयशी ठरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीचाही निषेध केला आहे.

या देशांनी इस्राईलला सूट दिली, इस्राईलला शस्त्रास्त्रे पुरविली आणि सैन्याची मदत पुरविली, तेही या युद्ध गुन्ह्यात भागीदार आहेत.

- रियाद अल मलिकी, परराष्ट्र मंत्री, पॅलेस्टाईन

गाझामधील वेढा हटवावा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझामधील पॅलेस्टिनच्या संरक्षणासाठी जबाबदार भूमिका घेतली पाहिजे. मानवी संकट रोखण्यासाठी गाझाला मदत पुरविण्याची ही वेळ आहे.

- राजपुत्र फैसल बिन फरहान, सौदी अरेबिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT