ग्लोबल

Israel-Hamas:इस्राइल-हमासमधील संघर्ष वाढला, भीषण गोळीबारात सुमारे 300 पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्राइल आणि हमासच्या चकमकीत ३१३ पॅलेस्टिनियन नागरिकांचा मृत्यू झाला असून गाझापट्टीमधील १९९० लोक जखमी झाले आहेत.

Manoj Bhalerao

हमासने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर दिवसेंदिवस परिस्थिती भीषण बनत चालली आहे. अशातच इस्राइलचं लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत अंदाजे ३१३ पॅलेस्टिनिन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती टाईम्स ऑफ इस्राइलने दिली आहे.

पॅलेस्टिनियन नागरिकांच्या मृत्यूची संख्या हमासद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या गाझापट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने देखील सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, या चकमकीत ३१३ पॅलेस्टिनियन नागरिकांचा मृत्यू झाला असून गाझापट्टीमधील १९९० लोक जखमी झाले आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्या बहुतांश लोकांनी इस्राइलच्या प्रतिहल्ल्यात आपला जीव गमावला आहे. इस्राइलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. त्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. गाझामध्ये आता पर्यंत ४०० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं असून काहींना बंदी करण्यात आलं आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इस्राइलने दिली.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे सर्वोच्च प्रवक्ते, डॅनियल हगारी यांनी टाईम्स ऑफ इस्रायलला माहिती दिली की,“सध्या [किब्बुत्झ] कफर आझा येथे सैन्ये लढत आहेत, मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये शोध सुरू आहेत. सर्व शहरांमध्ये आयडीएफ फोर्स आहेत, असे कोणतेही शहर नाही जिथं आयडीएफ फोर्स नाही.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Gramin: 'कल्याण ग्रामीण'मधून महायुतीचा उमेदवार रिंगणात कधी? शिंदे गटाची आळीमिळी गुपचिळी

Share Market Closing: शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक'; सेन्सेक्स 600 अंकांनी वाढला, बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ

मायरा वायकुळच्या भावाला पाहिलंत का? दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवला चेहरा, नेटकरी म्हणतात- हा तर हुबेहूब...

Tata-Airbus: नागपूरच्या टाटा एअरबस प्रोजेक्टचे गुजरातला उद्घाटन? काँग्रेसचा मोठा आरोप; "महाराष्ट्राच्या जखमेवर मिठ..."

Bjp Candidates Third List: लातूरमध्ये देखमुख विरुद्ध चाकूरकर थेट लढाई, भाजपची तिसरी यादी जाहीर; काँग्रेस बंडखोरांना संधी

SCROLL FOR NEXT