Haman-Israel War News : हमास आणि इस्राईलमधलं युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. हमासने शुक्रवारी एक व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये तीन इस्रायली महिलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये तीन महिलांना ताब्यात घेऊन ओलीस ठेवण्यात सांगण्यात आलंय.
विशेष म्हणजे तीनपैकी दोन महिलांनी आपण इस्रायली सैनिक असल्याचं म्हटलंय तर तिसरी महिला सामान्य नागरीक आहे. AFP ने याबाबतची ओळख पटवली आहे. पाच मिनिटांच्या त्या व्हिडीओमध्ये इस्रायली महिला दिसत आहेत.
ओलीस ठेवण्यात असलेल्या महिला व्हिडीओमध्ये सांगतात की, १०७ दिवसांपासून आम्हाला ताब्यात ठेवलेलं आहे. यावरुन हा व्हिडीओ रविवारी रेकॉर्ड केलेला असावा, असा अंदाज आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने युद्धावर टिपण्णी करत, इस्रायलने गाझामधील नरसंहार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर हा व्हिडीओ जारी करण्यात आलेला आहे.
७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये अपहरण केलेल्या ओलीसांची सुटका करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यानंतर सुटकेऐवजी हा व्हिडीओ जारी झाला. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्ल्यामध्ये इस्रायलमधील सुमारे ११४० नागरिकांचा मृत्यू झाला होता.
हमासने २५० जणांना ओलीस ठेवल्याचा इस्रायलचा दावा आहे. तर त्यापैकी १३२ जण गाझामध्ये असल्याचं सांगितलं जातंय. हमासच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात किमान २६ हजार ८३ पॅलेस्टिनी नागरिक मृत पावले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.