Israel Hamas War iran threat to israeli over occupation of gaza Benjamin Netanyahu Us joe biden marathi news  
ग्लोबल

Israel Hamas War : '...तर आमचेही हात ट्रिगरवर', इराणची इस्त्राइलला धमकी; अमेरिकेनेही दिला गंभीर इशारा

इस्राइल आणि गाझा यांच्यातील युद्ध कधीही मोठं रुप घेऊ शकतं.

रोहित कणसे

इस्राइल आणि गाझा यांच्यातील युद्ध कधीही मोठं रुप घेऊ शकतं. इस्त्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १० वा दिवस असून यादरम्यान इराण आणि अमेरिकेकडून केली जात असलेली विधाने पाहता हे युध्द आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इस्त्रायलने आता लेबनॉनवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याने युद्धाची व्याप्ती देखील वाढताना दिसत आहे. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. याआधी लेबनॉनमधून इस्रायलच्या एका गावात क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता.

या युद्धादरम्यान इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. जर गाझा पट्टी काबीज करण्याचा प्रयत्न केला तर इराणसह इतर देशांचे हात देखील ट्रिगरवर आहेत, असा गंभीर इशारा इराणकडून इस्त्राइला देण्यात आला आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांनी इस्रायलला इशारा दिला की, पॅलेस्टिन विरोधातील आक्रमकता त्यांनी थांबवली नाही तर या भागात इतर देशही कारवाई करण्यास तयार आहेत. फार्स वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतल्यानंतर होसेन म्हणाले की, इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत तर, या प्रदेशातील सर्व देशांचे हात देखील ट्रिगरवर आहेत. इराणच्या या इशाऱ्यामुळे या प्रदेशातील तणाव वाढला आहे.

तर ती मोठी चूक असेल

इस्रायलने उत्तर गाझा पट्टीत प्रवेश करण्याची पूर्ण तयारी केली आहे. सीमेवर लष्कर तैनात असून फक्त इशाऱ्याची वाट पाहत आहे. दरम्यान, गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा इस्रायलचा प्रयत्न ही मोठी चूक असू शकते, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

आतापर्यंत 4000 लोकांचा मृत्यू

गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले होते. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये युद्ध सुरू आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी एकूण 4000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी 2670 गाझा भागात मरण पावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT